विजेवर चालणारे वाहन खरेदी करण्यासाठी वाढीव निधी

मंत्र्यांसाठी वाहन खरेदीच्या निधीत पाच लाखांची वाढ

विजेवर चालणारे वाहन खरेदी करण्यासाठी वाढीव निधी

मुंबई: प्रतिनिधी 

प्रशासकीय कामात सुलभता येण्याबरोबरच पर्यावरण संरक्षणासाठी मंत्री आणि अधिकाऱ्यांना वाहन खरेदीसाठीच्या निधीत वाढ करण्यात आली आहे. या वाहन धोरणानुसार मंत्र्यांना विद्युत वाहन खरेदी करण्यासाठी पाच लाखांचा अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आला आहे. 

सध्या. राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आपल्या पसंतीप्रमाणे वाहन खरेदी करू शकतात. त्याला निधीची मर्यादा नाही. कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री यांच्यासाठी ३० लाखाची मर्यादा आहे. मात्र, विजेवर चालणारे वाहन खरेदी केल्यास ३५ लाख रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. 

सचिव, प्रधान सचिव, महाधिवक्ता, माहिती आयुक्त यांना वाहन खरेदीसाठी २५ लाख, विभागीय आयुक्त, महासंचालक, पोलीस महानिरीक्षक यांना १७ लाख, जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक यांना १५ लाख तर राज्यस्तरीय समविभागीय अधिकारी यांना १२ लाख रुपयांचा निधी वाहन खरेदीसाठी मंजूर करण्यात आला आहे. 

हे पण वाचा  'निवडणूक प्रक्रिया 31 जानेवारी पूर्वी पूर्ण करा'

About The Author

Advertisement

Latest News

कोणत्या अधिकारात रोखली अनधिकृत बांधकामावरील कारवाई? कोणत्या अधिकारात रोखली अनधिकृत बांधकामावरील कारवाई?
नवी मुंबई: प्रतिनिधी  निवासी गृहनिर्माण संस्थांमधील अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी महापालिकेने नोटीस बजावलेली असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणत्या अधिकारात ही...
कोथरूड येथे क्षुल्लक कारणावरून गोळीबार
अर्चना कुटे यांच्याकडून अडीच कोटींचा मुद्देमाल हस्तगत
विजेवर चालणारे वाहन खरेदी करण्यासाठी वाढीव निधी
'अमराठी बिल्डरांना विकून टाकली मुंबई'
'नितीन गडकरी यांचे धोरण शेतकऱ्यांच्या हिताचे'
पुतळ्यावर रंग फेकणारा शिवसैनिकाचा भाऊच

Advt