धनंजय देशमुख यांनी मागे घेतली याचिका
तपासाबाबत बऱ्यापैकी समाधानी असल्याचे नोंदवले मत
औरंगाबाद: प्रतिनिधी
संतोष देशमुख अपहरण आणि हत्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यापूर्वी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडे दाखल केलेली याचिका मागे घेत तपासाबाबत बऱ्यापैकी समाधानी असल्याचे मत व्यक्त केले आहे.
खंडणीप्रकरणी सीआयडीच्या कोठडीत असलेला वाल्मिक कराड याच्यावर संतोष देशमुख यांच्या खुनाचा गुन्हा दाखल करावा तसेच त्याच्यावर संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत (मोक्का) कारवाई करावी या मागणीसाठी धनंजय देशमुख यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. मात्र, तपासाबाबत बऱ्यापैकी समाधानी असल्याचे सांगून त्यांनी ही याचिका मागे घेतली आहे.
'... तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार'
धनंजय देशमुख यांना न्याय मागण्यासाठी मुख्यमंत्र्यांपर्यंत जावे लागणे हे दुर्दैवी असल्याचे मत संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केले आहे. जोपर्यंत देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळत नाही आणि मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जात नाही तोपर्यंत आपले आंदोलन सुरूच राहील, असा इशाराही त्यांनी दिला.