'... तर शिंदे आणि पवारांना थोडा थोडा काळ मुख्यमंत्री करू'

नाना पटोले यांची मल्लिनाथी

'... तर शिंदे आणि पवारांना थोडा थोडा काळ मुख्यमंत्री करू'

नागपूर: प्रतिनिधी 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांचीही महायुतीमध्ये बिकट अवस्था आहे. त्यांनी काँग्रेसबरोबर यावे. आम्ही त्यांची काळजी घेऊ. दोघांनाही ठराविक कालावधीसाठी मुख्यमंत्री पद देऊ, अशी मल्लिनाथी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. 

धुलीवंदनाचे औचित्य साधून पटोले यांनी पत्रकारांशी संवाद साधत विविध नेत्यांना शुभेच्छा दिल्या. देवेंद्र फडणवीस यांची प्रकृती ठीक राहो. पूर्वी फडणवीस राज्याच्या भल्यासाठी लढत होते. तेच लढाऊ फडणवीस पुन्हा पहायला मिळू दे. मी त्यांना शुभेच्छा देतो. फडणवीस हल्ली खूप फेकाफेकी करतात. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणे सतत खोटे बोलू नये, असेही पटोले म्हणाले. 

अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची महायुतीत वाईट अवस्था आहे. त्यांचे पक्ष शिल्लक राहतील का, भारतीय जनता पक्ष त्यांना शिल्लक राहू देईल का, हाच प्रश्न आहे. अजित पवार यांनी सादर केलेल्या राज्याचा अर्थसंकल्प हा त्यांच्या मनातील अर्थसंकल्प नाही. हा बिन पैशाचा अर्थसंकल्प आहे, अशी टीकाही पटोले यांनी केली. 

हे पण वाचा  'पुरातन मंदिराचे जतन हे महत्त्वाचे कार्य''

एकनाथ शिंदे यांच्या अनेक योजना बंद केल्या जात आहेत. त्यांच्या लोकांची सुरक्षा काढली जात आहे. भाजपच्या लोकांची मात्र कायम आहे. त्यांच्यामध्ये मुख्यमंत्री पदासाठी चढाओढ आहे. शिंदे व पवार दोघांनीही काँग्रेसकडे यावे. काँग्रेस व राष्ट्रीय पक्ष आहे. आम्ही त्यांना पाठिंबा देऊ. दोघांनाही मुख्यमंत्रीपद देऊ, असे पटोले म्हणाले. 

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या रूपाने महाराष्ट्राला अतिविद्वान व्यक्तिमत्व लाभले आहे, असे म्हणत पटोले यांनी त्यांनाही शुभेच्छा दिल्या. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार हे सुपरफास्ट नेते आहेत. त्यांनी अधिक मोठे व्हावे, अधिक पळावे, अशा शुभेच्छा पाठवले यांनी वडेट्टीवार यांना दिल्या. 

 

Share this article

About The Author

Post Comment

Comment List

Follow us

Latest News