युद्धबंदी भंग करून इस्राएलचा लेबनॉनवर हवाई हल्ला
हिजबुल्लाचे शस्त्रसाठे नष्ट केल्याचा दावा
नवी दिल्ली: प्रतिनिधी
इस्राएल आणि लेबनॉन यांच्यात युद्धबंदी करार असतानाही इस्रायलने पूर्व लेबानानमध्ये अनेक ठिकाणी हवाई हल्ले केले आहेत. हा युद्धबंदी कराराचा भंग असल्याचा आरोप लेबनॉनने केला असून आपण केवळ हिजबुल्ला या दहशतवादी संघटनेची शस्त्रनिर्मिती व साठवणुकीची ठिकाणे नष्ट केल्याचा दावा इस्रायलने केला आहे.
दीर्घकाळ सुरू राहिलेल्या संघर्षात गाझा पट्टी उध्वस्त झाल्यानंतर अमेरिका आणि फ्रान्सच्या पुढाकाराने इस्राएल आणि लेबनॉनमध्ये २७ नोव्हेंबर २०२४ मध्ये युद्धबंदी करणार करण्यात आला. मात्र, त्यानंतरही अधून मधून इस्रायली लढाऊ विमाने लेबानानच्या प्रदेशात हल्ले करतच आहेत. आपण लेबनॉनच्या नागरी भागात किंवा शासकीय आस्थापनांवर हल्ले करत नाही. केवळ हिजबुल्ला या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेच्या तळांना लक्ष्य करीत असल्याचा इस्राएलचा दावा असतो.
त्याचप्रमाणे इस्राएलच्या लढाऊ विमानांनी लेबानानच्या पूर्वेकडील डोंगराळ भागात आणि दक्षिण पूर्व भागात क्षेपणास्त्र डागली आहेत. करारानुसार इस्रायलने लेबानानमधून १५ फेब्रुवारी २०२५ पर्यंत आपले सैन्य मागे घेणे अपेक्षित होते. मात्र, अद्यापही इस्राएलचे सैन्य काही भागात कायम आहे. हिजबुल्लाकडून युद्धबंदी करार पाळला जात नसल्यामुळे आपण हवाई हल्ले करत असल्याचा इस्राएलचा दावा आहे तर इस्रायल विनाकारण हल्ले करीत असल्याचा लेबनॉनचा आरोप आहे.
Comment List