अजित पवारांनी काँग्रेसला पाडले मोठे खिंडार

शंभरहून अधिक कार्यकर्ते व पदाधिकारी करणार पक्षांतर

अजित पवारांनी काँग्रेसला पाडले मोठे खिंडार

पुणे: प्रतिनिधी 

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीतील घटक पक्षांना मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काँग्रेसला मोठे खिंडार पाडले आहे. काँग्रेसचे अनेक महत्त्वाचे पदाधिकारी आणि शंभरहून अधिक कार्यकर्ते लवकरच काँग्रेसला रामराम करून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती पक्षाच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. 

युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील, काँग्रेसची विद्यार्थी संघटना असलेल्या एनएसयुआयचे शहर सरचिटणीस कृष्णा साठे या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांसह शंभरहून अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते लवकरच काँग्रेसचा राजीनामा देऊन अजित पवार गटात सामील होणार आहेत. पुढील दोन-तीन दिवसातच त्यांचा पक्षप्रवेश निश्चित होणार आहे. 

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांच्या निधनानंतर कसबा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या तिकिटावर निवडून येत माजी आमदार रवींद्र धगेकर यांनी भाजपच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडले होते. या यशानंतर पक्षाने त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना लोकसभा आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीतही उमेदवारी दिली. मात्र, या लढाऊ नेत्याने, सत्ता असल्याशिवाय जनतेची कामे होत नाहीत, असे सांगत काँग्रेसमधून शिवसेना शिंदे गटात नुकताच प्रवेश केला आहे. विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झालेल्या महाविकास आघाडीतील घटक पक्षांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या पक्षांतराच्या घडामोडी आव्हानात्मक ठरणार आहेत. 

हे पण वाचा  'प्रा डॉ मंगल डोंगरे यांचे शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान'

Tags:

About The Author

Advertisement

Latest News

Advt