अजित पवारांनी काँग्रेसला पाडले मोठे खिंडार

शंभरहून अधिक कार्यकर्ते व पदाधिकारी करणार पक्षांतर

अजित पवारांनी काँग्रेसला पाडले मोठे खिंडार

पुणे: प्रतिनिधी 

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीतील घटक पक्षांना मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काँग्रेसला मोठे खिंडार पाडले आहे. काँग्रेसचे अनेक महत्त्वाचे पदाधिकारी आणि शंभरहून अधिक कार्यकर्ते लवकरच काँग्रेसला रामराम करून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती पक्षाच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. 

युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील, काँग्रेसची विद्यार्थी संघटना असलेल्या एनएसयुआयचे शहर सरचिटणीस कृष्णा साठे या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांसह शंभरहून अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते लवकरच काँग्रेसचा राजीनामा देऊन अजित पवार गटात सामील होणार आहेत. पुढील दोन-तीन दिवसातच त्यांचा पक्षप्रवेश निश्चित होणार आहे. 

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांच्या निधनानंतर कसबा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या तिकिटावर निवडून येत माजी आमदार रवींद्र धगेकर यांनी भाजपच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडले होते. या यशानंतर पक्षाने त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना लोकसभा आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीतही उमेदवारी दिली. मात्र, या लढाऊ नेत्याने, सत्ता असल्याशिवाय जनतेची कामे होत नाहीत, असे सांगत काँग्रेसमधून शिवसेना शिंदे गटात नुकताच प्रवेश केला आहे. विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झालेल्या महाविकास आघाडीतील घटक पक्षांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या पक्षांतराच्या घडामोडी आव्हानात्मक ठरणार आहेत. 

हे पण वाचा  'लवकरच जाणार मंत्रिमंडळातील सहा सात मंत्र्यांचा बळी'

Share this article

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

Follow us

Latest News

'आम्ही बहिणींचे लाडके, त्यामुळे तुम्ही झाले दोडके'
'विधानसभा निवडणुकीतील महायुतीचा विजय डुप्लिकेट'
आंतरराष्ट्रीय पर्यटनाला चालना देण्यासाठी एलपीओ हॉलिडेजकडून ‘एक्सक्लुझिव्ह B2B ट्रॅव्हल एजंट्स मीटचं आयोजन!
'कबरीला कायदेशीर संरक्षण, तरी नाही महिमामंडण'
बार्टी, पुणे मार्फत अनुसुचित जातीच्या उमेदवारांना जर्मन भाषेचे प्रशिक्षण
धर्मा प्रॅाडक्शन्स - एव्हीके पिक्चर्स घेऊन येत आहे ‘ये रे ये रे पैसा ३’ 
'लवकरच जाणार मंत्रिमंडळातील सहा सात मंत्र्यांचा बळी'
अजित पवारांनी काँग्रेसला पाडले मोठे खिंडार
श्री विघ्नहर साखर कारखान्यावर सत्यशील शेरकर यांची निर्विवाद सत्ता
कुसुमाग्रज स्मारकाला डॉ. नीलम गोऱ्हे यांची भेट