'... तर एनआयए देखील करणार दगडफेकीचा तपास'

नागपूर घटनेच्या काश्मीर कनेक्शनची पडताळणी

'... तर एनआयए देखील करणार दगडफेकीचा तपास'

नागपूर: प्रतिनिधी 

औरंगजेबाच्या कबरीचे प्रतिकात्मक दहन करताना धार्मिक साहित्य देखील जाळल्याची अफवा पसरवून शहरात निर्माण करण्यात आलेल्या दंगलसदृश घटनेची, विशेषत: दगडफेकीची कार्यपद्धती (मोडस ओपरेंडी) काश्मीरमध्ये होत असलेल्या दगडफेकीशी साधर्म्य असणारी असल्याने स्थानिक पोलिसांबरोबरच राज्य दहशतवाद विरोधी पथकही नागपूर प्रकरणाचा समांतर तपास करणार आहे. तसेच या दगडफेकीतील काश्मीर कनेक्शनची शक्यता अधोरेखित झाल्यास राष्ट्रीय तपास यंत्रणा दखील या तपासात सहभागी होण्याची शक्यता आहे. 

राज्यभरात क्रूरकर्मा औरंगजेब याच्या विरोधात संतापाचे वातावरण निर्माण झालेले असताना त्याची कबर उखडून टाकावी, अशी मागणी करण्यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने नागपूर येथे औरंगजेबाच्या कबरीचे प्रतीकात्मक दहन करण्यात आले. या आंदोलनात धार्मिक साहित्य देखील जाळण्यात आल्याचे वृत्त समाजमाध्यमांवरून अल्पकाळातच पसरले.

त्यामुळे महाल परिसरात जमलेल्या जमावाने अनेक वाहनांची तोडफोड व जाळपोळ केली. तसेच पोलिसांवर दगडफेकीही केली. या दगडफेकीत 34 जण जखमी झाले आहेत. जखमींवर पोलीस उपायुक्त दर्जाच्या तीन अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. जखमी मधल काहींची प्रकृती गंभीर आहे. पोलिसांनी याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने 65 जणांना अटक केली आहे. याप्रकरणी पाच प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) दाखल करण्यात आले आहेत. 

हे पण वाचा  बार्टी, पुणे मार्फत अनुसुचित जातीच्या उमेदवारांना जर्मन भाषेचे प्रशिक्षण

हा दगडफेक आणि जाळपोळीचा प्रकार पूर्वनियोजित असल्याचा दावा पोलिसांकडून केला जात आहे. घटनास्थळी रेल्वेच्या रूळांमध्ये ज्या पद्धतीचे दगड असतात तसे दगड एका गाडीतून आणून ठेवल्याचे आढळलेले आहे. कबरीच्या प्रतीकात्मक दहनाचे आंदोलन दुपारी तीन वाजता संपले. त्यानंतर रात्री आठ वाजेपर्यंत या परिसरात काहीच घडले नाही. आठ वाजल्यानंतर जमाव जमला आणि दगडफेक आणि जाळपोळीचे प्रकार घडले. यावरून हा प्रकार पूर्वनियोजित असल्याचा अंदाज पोलिसांनी बांधला आहे. 

Share this article

About The Author

Post Comment

Comment List

Follow us

Latest News

'... तर एनआयए देखील करणार दगडफेकीचा तपास'
'... तर रशिया युक्रेन युद्ध झालेच नसते'
अखेर सुनीता विल्यम्स आणि सहकाऱ्यांची यशस्वी घरवापासी
'भाजपची स्क्रिप्ट वाचून मंत्रिपदाची किंमत चुकवता का?'
नागपूर दंगल सरकारपुरस्कृत आहे म्हणावे का?
BARTI news | वेबसाईट द्वारे महाडचा सत्याग्रह आता मराठीसह कन्नड भाषेतही!
'ऊसतोडणी कामगारांसाठी एक खिडकी योजना राबवा'
प्रशांत दामले यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा नामंजूर
विरोधी गटाचे मताधिक्य रोखण्याचे सत्ताधारी गटाकडे मोठे आव्हान!
निवडणूक सह्याद्री साखर कारखान्याची पण पेरणी मात्र नगरपरिषद निवडणुकीची!