लाहोरपाठोपाठ कराचीतही भर दिवसा धमाका

अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध नसली तरी नागरिकांमध्ये घबराट

लाहोरपाठोपाठ कराचीतही भर दिवसा धमाका

इस्लामाबाद: वृत्तसंस्था 

आज सकाळी लाहोरमध्ये झालेल्या तीन स्फोटांच्या पाठोपाठ दीड ते दोन तासानंतर कराची येथेही एक स्फोट झाल्याचे वृत्त आहे. शासकीय यंत्रणा किंवा पाकिस्तानी लष्कर यांच्याकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, हा स्फोट म्हणजे क्षेपणास्त्र. हल्ला असल्याचा प्रत्यक्षदर्शींचा दावा आहे. 

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने क्षेपणास्त्र हल्ला करून पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू काश्मीरमधील दहशतवादी तळ उध्वस्त केले आहेत. हा हल्ला मंगळवार, बुधवारच्या मध्यरात्री एक ते दीड या सुमारास करण्यात आला.

त्यानंतर आज सकाळी नऊ वाजता लाहोरमध्ये सलग तीन स्फोट झाले. त्यानंतर कराची येथेही एक स्फोट झाला. भारताला अगभरात बदनाम करण्यासाठी पाकिस्तान स्वतः आपल्याच शहरांमध्ये स्फोट घडवून आणत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याचा प्रमाणे बलोच लिबरेशन आर्मी किंवा तहरिक ए तालिबान पाकिस्तान यांनी हे स्फोट घडवले असल्याचीही चर्चा आहे. 

हे पण वाचा  चोराच्या उलट्या बोंबा, घाबरलेल्या पाकिस्तानचा कांगावा

About The Author

Advertisement

Latest News

Advt