आय टी रिटर्न फाईलसाठी भारतात प्रथमच मोबाईल ॲप सेवा

आय टी रिटर्न फाईलसाठी भारतात प्रथमच मोबाईल ॲप सेवा

मुंबई / रमेश औताडे 

भारतात प्रथमच आय टी रिटर्न फाईल आता मोबाईल ॲप च्या माध्यमातून भरण्यासाठी माय आय टी रिटर्न संस्थेने ने सोपी सुलभ सेवा  भारताच्या आयकर विभागाची अधिकृत मान्यता घेऊन सुरू केली असल्याची माहिती स्कोरीडोव्ह चे संस्थापक साकार यादव यांनी दिली.

आयकर विवरणपत्रे फाइल करणे सुलभ व्हावे, त्या प्रक्रियेत क्रांती घडावी या हेतूने हे मोबाइल ॲप डिझाइन करण्यात आले आहे. थेट स्मार्टफोन्सच्या माध्यमातून कर फाइल करण्याची मुभा करदात्यांना मिळाली आहे.  त्यासाठी त्यांना कोणतीही प्रत्यक्ष कागदपत्रे अपलोड करण्याची गरज भासणार नसल्याने कराचे फायलिंग घरात किंवा ऑफिसमध्ये बसून कुणीही भरू शकतो. 

केवळ ९९ रुपयांत कर फायलिंग सेवा अचूकता, कार्यक्षमता व सर्व सरकारी नियमांची पूर्तता यांची निश्चिती करत भारत सरकारच्या आयकर विभागाने अधिकृत मान्यता दिली आहे. असे स्कोरीडोव्ह चे संस्थापक साकार यादव यांनी सांगितले.

000

Tags:

About The Author

Related Posts

Advertisement

Latest News

'भारत आणि चीन संबंधात तिसऱ्याची मध्यस्थी नको' 'भारत आणि चीन संबंधात तिसऱ्याची मध्यस्थी नको'
बीजिंग: वृत्तसंस्था  भारत आणि चीन यांच्यातील परस्पर संबंधात कोणत्याही त्रयस्थ देशाची मध्यस्थी नको असल्याचे भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी चीनचे...
'शरीर संबंधास नकार, मित्रांसमोर अवमान ही क्रूरताच'
'निवडणुका जाहीर होतील त्यावेळी युतीबाबत चर्चा करू'
''आधारकार्डमध्ये कार्डधारकाचा रक्तगट समाविष्ट करावा'        
कारची काच फोडून भरदिवसा सव्वा लाख रुपये लंपास; वडगाव मावळ येथील घटना
'तिरंगा नव्हे तर भगवा भारताचा राष्ट्रध्वज'
'कोणी कुणाला केवळ युतीसाठीच भेटतात असे नाही'

Advt