'तिरंगा नव्हे तर भगवा भारताचा राष्ट्रध्वज'

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे यांचे वादग्रस्त वक्तव्य

'तिरंगा नव्हे तर भगवा भारताचा राष्ट्रध्वज'

कोल्हापूर: प्रतिनिधी

तिरंगा ध्वज नव्हे तर भगवा ध्वज हा भारताचा राष्ट्रध्वज आहे, असे वादग्रस्त विधान शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे यांनी केले आहे. वादग्रस्त विधानांसाठी नेहमी चर्चेत असलेल्या भिडे यांच्या या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. 

आज देशात एक महायज्ञ सुरू आहे. लाल किल्ल्यावर भगवा ध्वज फडकवून या महायज्ञाची सांगता करायची आहे, असे उद्गार भिडे यांनी काढले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर मोठ्या प्रमाणावर नैराश्य पसरले. मात्र, त्यानंतर संभाजी महाराज छत्रपती झाले. केवळ पावणे नऊ वर्ष राज्य करताना त्यांनी पित्याच्या पावलावर पाऊल टाकत कर्तृत्व गाजवले. त्यानंतर औरंगजेबाने त्यांची क्रूर हत्या केली, असे भिडे यांनी सांगितले. 

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यापासून प्रेरणा घेऊन मराठा वीरांनी संपूर्ण देश पादाक्रत केला. दिल्लीचे तख्त फोडले. लाल किल्ल्यावर भगवा ध्वज फडकवला. या पराक्रमाची आपल्याला पुनरावृत्ती करायची आहे, असे आवाहन भिडे यांनी उपस्थितांना केले. आज स्वातंत्र्य आहे. मात्र, आपल्याला काशी विश्वेश्वराची पुन्हा स्थापना करून, पाकिस्तानचा नायनाट करून भगव्याचे स्वातंत्र्य मिळवायचे आहे, असेही ते म्हणाले. 

हे पण वाचा  मावळ तालुक्यातील लाचखोर मंडलाधिकारी एसीबीच्या जाळ्यात; २ लाखांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले

About The Author

Advertisement

Latest News

Advt