मुंबई / रमेश औताडे
अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण करून जून २०२५ पासून ते लागू करावे या व इतर मागण्या घेऊन महाराष्ट्रातील सकल मातंग समाज मंगळवारी आझाद मैदानात आंदोलनात उतरला होता. राज्यभरातून आलेल्या या समाजाने जय लहुजीचा नारा देत सर्व आझाद मैदान परिसर दणाणून सोडला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खेड्यापाड्यातून आलेल्या या समाजाच्या पिण्याच्या पाण्याची व जेवणाची सोय केली होती. समाजाचे नेते राजू मानकर यांनी यावेळी भर भव्य मंडपात जेवण वाटप नियोजन केले होते त्याचे आंदोलनकर्ते कौतुक करत होते.राष्ट्रीय मातंग स्वाभिमानी संघटन चे कार्यकर्ते स्वयंसेवक म्हणून कार्यरत होते.राज्य समन्वयक मारुती वाडेकर व आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
राज्यभरातून असलेल्या या हजारोंच्या संख्येतील आंदोलनाला गालबोट लागू नये म्हणून कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासाठी शेकडो पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. खुप लढलो बेकीने आता लढूया एकीने असा फलक लाऊन हे आंदोलन सुरू होते.महाराष्ट्रील हिंदू मातंग समाज आजही अनेक प्रकारे विकासापासून दूर आहे.सरकारने आमच्या मागण्या आता मान्य केल्या नाही तर यापुढचे आंदोलन तीव्र करू असा इशारा यावेळी देण्यात आला.
000
Tags:
About The Author
Related Posts
Latest News
13 Aug 2025 19:00:08
पुणे : प्रतिनिधी
मंगळवार पेठ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन च्या शेजारील राज्य शासनाच्या एमएसआरडीसीच्या जागेवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब...