सांप्रदायिक क्षेत्रातील विनोदाचार्य कीर्तनकार ह.भ.प. मधुकर गिरी महाराज यांचे निधन 

सांप्रदायिक क्षेत्रातील विनोदाचार्य कीर्तनकार ह.भ.प. मधुकर गिरी महाराज यांचे निधन 

मार्डी (प्रतिनिधी) उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज येथील .येथील रहिवाशी व सांप्रदायिक क्षेत्रातील व महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प मधुकर गोविंद गिरी महाराज यांचे दि.१६  शुक्रवारी सकाळी  निधन झाले.

गेल्या काही महिन्यापासून गिरी हे मधुमेह आजाराने त्रस्त होते, सोमवारी  सोलापुरातील एका खाजगी रुग्णालयात त्यांना दाखल केले होते व  त्यांच्यावर उपचार सुरू असताना शुक्रवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालावली. मृत्यू समयी ते  ७५ वर्षांचे होते. सांप्रदायिक क्षेत्रातील महाराष्ट्रातील विनोदाचार्य कीर्तनकार म्हणून ह. भ. प मधुकर गिरी महाराज यांची ओळख होती.

सन १९७६ सालापासून ते नान्नज ग्रामपंचायत कार्यालयात लिपिक पदावर कार्यरत होते.सन  २०००२ साली लिपिक पदाच्या  नोकरीचा राजीनामा देत किर्तन सेवेला सुरुवात केली होती. युट्यूबसहसह सोशल मीडियावर गिरी महाराज यांची आणि कीर्तने गाजली आहेत.तर मराठी वहिनी वरील  झी टॉकीज वाहिनी, सन मराठी, मी मराठी, व मन मंदिर  यासह इतरही मराठी वाहिन्यावर गिरी महाराज यांची कीर्तने  प्रसारित झाली आहेत. गेली ३५ ते ४०   वर्षापासून ते सांप्रदायिक क्षेत्रात कीर्तन सेवेतून समाज प्रबोधन सेवा केली आहे. शुक्रवारी चार वाजण्याच्या सुमारास नान्नज स्मशानभूमीत यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारावेळी सांप्रदायिक क्षेत्रातील व्यक्ती व इतर हजारो नागरिक  सहभागी झाले होते. महाराष्ट्रातील अनेक गावात गिरी महाराज यांनी कीर्तन सेवा बजावली तर इतरही राज्यात त्यांनी कीर्तन सेवा केली आहे.

ह.भ.प  मधुकर  गिरी महाराज यांच्या पश्चात पत्नी, तीन भाऊ,भावजय,दोन बहिण, एक मुलगा,दोन मुली,सून, नातवंडे, भाचे असा परिवार आहे.

000

Tags:

About The Author

Advertisement

Latest News

'फडणवीसांकडून बौद्धिक दिवाळखोरी व विकृतीचेच प्रदर्शन' 'फडणवीसांकडून बौद्धिक दिवाळखोरी व विकृतीचेच प्रदर्शन'
पुणे: प्रतिनिधी एकीकडे वायुसेना प्रमुखांच्या’ वक्तव्यातून संरक्षण खात्याचे वास्तव समोर आल्याने सत्ता पक्षाची पोलखोल झाली आहे. राहुल गांधी यांचे देशाप्रती...
महाराष्ट्र स्वराज्य पक्ष मुंबई युवक अध्यक्षपदी संतोष कदम!
निलेश चव्हाण याला 3 जून पर्यंत पोलीस कोठडी
भारत आणि रशिया यांच्यात दुरावा आणण्यासाठी...
गिरे तो भी टांग उपर, पाक फील्ड मार्शलनी पुन्हा ओकली गरळ
'ग्रीन अँड नेट झिरो बिल्डिंग संकल्पना स्वीकाराव्यात'
'जारण'च्या प्रमोशनल साँगने उडवला प्रेक्षकांचा थरकाप

Advt