छावा संघटनेचे विजय घाडगे यांची तब्येत बिघडली

प्रवासादरम्यान रुग्णवाहिकेतच केले उपचार

छावा संघटनेचे विजय घाडगे यांची तब्येत बिघडली

लातूर: प्रतिनिधी 

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आलेले छावा संघटनेचे नेते विजय घाडगे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून लातूरला परत येत असताना त्यांची तब्येत खालावली. प्रवासादरम्यान रुग्णवाहिकेतच त्यांच्यावर उपचार करण्यात आले. 

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे अधिवेशन काळात विधिमंडळात मोबाईलवर पत्ते खेळत असल्याचा व्हिडिओ प्रसिद्ध झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या लातूर दौऱ्यात छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तटकरे यांच्या पत्रकार परिषदेदरम्यान त्यांच्यासमोर पत्ते फेकून कोकाटे यांचा निषेध केला. त्यानंतर अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली. याप्रकरणी अजित पवार गटाचे राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांना त्वरित राजीनामा देण्याचे आदेश अजित पवार यांनी दिले. 

याप्रकरणी घाडगे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. गुंडांना बोलवून छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप असलेले सूरज चव्हाण यांना पुन्हा पक्षात स्थान दिले जाणार नाही, अशी ग्वाही अजित पवार यांनी दिल्याचे घाडगे यांनी सांगितले. त्याचप्रमाणे मंगळवारपर्यंत कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या बद्दल निर्णय घेतला जाईल, असे देखील उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले असे घाडगे यांनी सांगितले. त्यानंतर ते लातूर येथे परत येण्यासाठी निघाले असता त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाला आणि त्यांच्यावर रुग्णवाहिकेतच उपचार करण्यात आले. 

हे पण वाचा  सरकारी बिले न मिळाल्याने कर्जबाजारी कंत्राटदारांची आत्महत्या

About The Author

Advertisement

Latest News

Advt