- राज्य
- ... तर धनंजय मुंडे यांना पुन्हा मिळणार मंत्रीपद
... तर धनंजय मुंडे यांना पुन्हा मिळणार मंत्रीपद
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे महत्वाचे विधान
मुंबई: प्रतिनिधी
कृषी विभागातील घोटाळ्यात तत्कालीन मंत्री धनंजय मुंडे यांचा कोणताही संबंध नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले असून आणखी एका प्रकरणात त्यांचा हात नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांना पुन्हा मंत्रीपद बहार करण्यात येईल, असे संकेत उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रमुख अजित पवार यांनी दिले आहेत.
धनंजय मुंडे यांच्यावर मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी सहभाग असल्याचा आरोप आहे. मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक जोग हे या प्रकरणाचे सूत्रधार असल्याचा आरोप असून ते अटकेत आहेत. या प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा घेण्याचा मोठा दबाव राज्य सरकार आणि अजित पवार यांच्यावर आला होता. हा दबाव वाढल्यानंतर अखेर मुंडे यांनी प्रकृती अस्वस्थाचे कारण कृषी विभागातील घोटाळ्याचे आरोप करण्यात आले देऊन राजीनामा दिला. याच दरम्यान त्यांच्यावर कृषी विभागातील घोटाळ्याचे आरोप करण्यात आले असून त्याचा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पाठपुरावा केला.
कृषी विभागातील घोटाळ्या बाबत न्यायालयाने मुंडे यांना क्लीन चीट दिली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांच्या तपासात अथवा न्यायालयीन कामकाजात मुंडे यांचा सहभाग नसल्याचे स्पष्ट झाले तर त्यांना पुन्हा मंत्री पद दिले जाईल, असे अजित पवार यांनी सांगितले आहे.