- राज्य
- मंत्र्यांचे फोन टॅप केल्याचा रोहित पवार यांचा आरोप
मंत्र्यांचे फोन टॅप केल्याचा रोहित पवार यांचा आरोप
आपल्या आरोपांसाठी पुरावे देण्याचे अजित पवार यांचे आव्हान
मुंबई: प्रतिनिधी
अनेकदा अनेक मंत्र्यांचे मोबाईल नॉट रिचेबल असल्याचे दिसून येते. आपले फोन टॅप होत असल्याच्या भीतीने खुद्द मंत्री ते बंद ठेवत असल्याची शक्यता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे. मात्र, कोणावरही सरसकट आरोप करण्यापेक्षा त्याबद्दलचे पुरावे सादर करावे, या शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रोहित पवार यांना आव्हान दिले आहे.
महायुतीमध्ये विसंवाद असून परस्परांमध्ये विश्वासाचा अभाव आहे. त्यामुळे खुद्द आपल्या मंत्र्यांचे मोबाईल टॅप केले जात असल्याचा संशय असल्यामुळे अनेक मंत्री अनेकदा आपला मोबाईल बंद ठेवतात किंवा त्यांचा फोन नॉट रिचेबल येतो, असा आरोप रोहित पवार यांनी समाज माध्यमातून केला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रोहित पवार यांना कोणतेही आरोप करण्यापूर्वी त्याबद्दलचे पुरावे अथवा माहिती सादर करावी, अशा शब्दात त्यांना आव्हान दिले आहे. कोणतेही आरोप करताना त्यात काही तथ्य आहे हे दर्शवणारे किमान पुरावे दाखवणे आवश्यक आहे, असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले आहे.