अपघातग्रस्त विमानातील सर्व प्रवाशांचा मृत्यू

इमारतीला धडकल्याने झाला विमानाचा अपघात

अपघातग्रस्त विमानातील सर्व प्रवाशांचा मृत्यू

अहमदाबाद: वृत्तसंस्था

अहमदाबाद येथून लंडनकडे निघालेल्या एअर इंडियाच्या विमानाचा अपघात इमारतीला धडकल्यामुळे झाला असून विमानातील सर्व 242 प्रवासी व अधिकारी, कर्मचारी मरण पावल्याचे वृत्त आहे. मृतांमध्ये 11 मुले आणि दोन नवजात बालकांचा समावेश आहे. 

अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनला जाण्यासाठी एअर इंडियाच्या AI 121 या प्रवासी विमानाने उड्डाण केले. मात्र, विमानतळापासून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या एका होस्टेलच्या इमारतीला विमान धडकले. ही धडक इतकी जोरदार होती की, त्यानंतर विमानाने पेट घेऊन आकाशात कल्यार धुराचे ढग तयार झाले. 

हा अपघात अहमदाबाद शहरातील मेघानीनगर या रहिवासी भागात झाला. याच भागात शासकीय रुग्णालय असल्याने सर्व अपघातग्रस्त प्रवाशांची तातडीने रुग्णालयात रवानगी करण्यात आली. मात्र, या प्रवाशांपैकी कोणाचेही प्राण वाचू शकलेले नाहीत. 

हे पण वाचा  'ही तुच्छ राजकारणाची नाही, तर एकोपा दाखवण्याची वेळ'

About The Author

Advertisement

Latest News

Vadgoan Maval वडगाव मावळ नगरपंचायतीकडून प्रभाग रचनेची प्रक्रिया सुरू  Vadgoan Maval वडगाव मावळ नगरपंचायतीकडून प्रभाग रचनेची प्रक्रिया सुरू 
वडगाव मावळ प्रतिनिधी  निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग रचना निश्चित करण्याचे आदेश राज्य शासनाने दिल्यानंतर वडगाव मावळ नगरपंचायत प्रशासनाने तयारी सुरू केली...
मोराळे येरळा नदीवरील तात्पुरता रस्ता म्हणजे आळवा वरील पाणी
कोरेगाव-वाठार रस्ता झाला खड्ड्याचा
तळबीड पोलीस ठाण्याच्या हद्दीत परप्रांतीय वाढले
साताऱ्यात शिवसेनेच्या वतीने विमान अपघातग्रस्तांना भावपूर्ण श्रद्धांजली
म्हसवे जिल्हा परिषद गटात सबकुछ 'मानकुमरे'
रायसोनी कॉलेजच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागालाएनबीए मान्यता!

Advt