'... यासाठी दिले का वाळूचोरांचे हात तोडण्याचे आदेश?'

माजी आमदार वैभव नाईक यांचा मंत्री नितेश राणे यांना सवाल

'... यासाठी दिले का वाळूचोरांचे हात तोडण्याचे आदेश?'

नवी मुंबई: प्रतिनिधी 

मंत्री नितेश राणे यांनी नुकतेच दिलेले वाळू चोरांचे हात तोडण्याचे आदेश खरोखरच वाळू चोरीला आळा घालण्यासाठी आहेत की हप्ते वाढवून घेण्यासाठी, असा सवाल माजी आमदार वैभव नाईक यांनी राणे यांना केला आहे. 

राणे यांनी खरोखरच वाळू चोरीला आळा घालण्यासाठी हात तोडण्याचा इशारा दिला असेल तर त्याला सिंधुदुर्ग वासियांचा पाठिंबा आहे. मात्र, नेहमीप्रमाणे दिखाऊपणा करण्यासाठी किंवा हप्ते वाढवून घेण्यासाठी ही धमकी देण्यात आली असेल तर शिवसेना त्याचा विरोध करेल, असा इशारा नाईक यांनी दिला. 

नितेश राणे यांना खरोखरच वाळूचोरीला आळा घालण्यासाठी प्रयत्न करायचे असतील तर त्यांचे बंधू आमदार निलेश राणे यांच्या मतदारसंघात कोण कोण वाळूचोर आहेत आणि त्यांचे लागेबांधे कोणाकोणाशी आहेत याचा त्यांनी शोध घ्यावा आणि त्यांच्यावर कारवाई. करावी. तसे झाल्यास आम्ही नितेश राणे यांच्या पुढाकाराचे स्वागत करू. अन्यथा त्यांना शिवसेनेच्या विरोधाला सामोरे जावे लागेल असा इशाराही त्यांनी दिला. 

हे पण वाचा  आंबेडकर राष्ट्रीय स्मारकांच्या मागणीसाठी हजारो भीमसैनिकांचा ठिय्या

About The Author

Advertisement

Latest News

माझ्या नादी लागलं तर नांगराचा फाळ... माझ्या नादी लागलं तर नांगराचा फाळ...
सांगोला: प्रतिनिधी  धमक्या देणाऱ्या गोरक्षकांन खडे बोल सुनावताना, माझ्या नादाला लागलात तर मी शेतकऱ्याचा पोरगा आहे. नांगराचा फाळ तुमच्या..., असे...
विजेवर चालणाऱ्या वाहनांना अटल सेतूवर टोलमाफी
कुटुंबाला हातभार लावणाऱ्या मातांच्या मुलांचे सरकार करणार संगोपन
बालगंधर्व परिवार ट्रस्टच्या वतीने पाककला स्पर्धा उत्साहात संपन्न
सिंहगडाच्या कड्यावरून खोल दरीत कोसळला तरुण
रोहित पवार यांची व्यक्तिगत जातमुचलक्यावर मुक्तता
नव्या वर्षाच्या सुरुवातीला महापालिकांना मिळणार नवे सदस्य

Advt