हा घ्या मतचोरी केल्याचा पुरावा: अतुल लोंढे

विधानसभा निवडणुकीतील दस्तावेज नष्ट करण्याचे निवडणूक आयोगाचे परिपत्रक 

हा घ्या मतचोरी केल्याचा पुरावा: अतुल लोंढे

मुंबई,: प्रतिनिधी 

महाराष्ट्र व हरियाणा विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे सरकार हे लोकांनी दिलेल्या मतदानावर आलेले नाही तर निवडणूक आयोगाच्या मदतीने मतचोरी करुन आलेले सरकार आहे. मतचोरी कशी केली याचे पुरावे काँग्रेस पक्षाने आयोगाला देऊनही त्यावर काहीच कारवाई होत नाही. काँग्रेस पक्षाने घेतलेले आक्षेप योग्यच आहेत हे आयोग पुन्हा पुन्हा सिद्ध करत आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील दस्तावेज नष्ट करण्याचे परिपत्रक निवडणूक आयोगाने काढले आहे आणि हे परिपत्रक म्हणजेच मतचोरी केल्याचा आणखी एका पुरावा आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटले आहे.

यासंदर्भात बोलताना अतुल लोंढे म्हणाले की, निवडणूक आयोगाची चोरी पुन्हा पकडली आहे. आपण अपराधी आहोत, चोरी करत आहोत याचा पुरावा ते देत आहेत. महाराष्ट्रात चोरी पकडली गेली आहे. मतचोरीचे पुरावे लपवण्यासाठी आयोगाने कायद्यातही बदल केले. चंदिगड उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही आयोगाने सीसीटीव्ही फुटेज, मशिन रिडेबल व्होटर लिस्ट संदर्भातील कायदा बदलला. आता महाराष्ट्रातील निवडणुकीचे रेकॉर्ड नष्ट करण्यासाठी एक परिपत्रक काढले आहे.

लोकांनी दिलेल्या मतदानावर हे सरकार आलेले नाही तर चोरीचे सरकार महाराष्ट्र व हरियाणात आणलेले आहे, हे या परिपत्रकावरून स्पष्ट होते. आता बिहारमध्ये चोरीचा वेगळा प्रकार सुरु केला आहे, यांना आम्ही सोडणार नाही. लोकशाहीमध्ये लोकांनी निवडून दिलेले सरकार आले पाहिजे, मतदानाची चोरी केलेले सरकार संविधान संमत असू शकत नाही असेही अतुल लोंढे म्हणाले.

हे पण वाचा  मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट उघड

About The Author

Advertisement

Latest News

जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू: सपकाळ जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू: सपकाळ
हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी मुंबई: प्रतिनिधी राज्यातील भाजपा युती सरकार आणू पहात असलेला जनसुरक्षा कायदा हा...
Vadgoan Maval वडगाव नगरपंचायत डीपी’मध्ये ३० कोटींचा भ्रष्टाचार
न्या. भूषण गवई सरन्यायाधीश होणे म्हणजे सामाजिक समतेचा विजय
हा घ्या मतचोरी केल्याचा पुरावा: अतुल लोंढे
... तर मग हा मोर्चा न्यायचा कुठे?
'... म्हणून नाकारली मनसेच्या मोर्चाला परवानगी'
विठूरायाच्या पंढरीत १०८ रुग्णवाहिकेद्वारे १०९५ भाविकांची आरोग्यसेवा

Advt