Vadgoan Maval वडगाव नगरपंचायत डीपी’मध्ये ३० कोटींचा भ्रष्टाचार

अनेक मोठ्या बिल्डरांनी पैसे देऊन आरक्षण बदलून घेतल मनसेचे माजी तालुकाध्यक्ष रुपेश म्हाळसकर यांचा गंभीर आरोप

निवडणुकीमध्ये खर्च करण्यात आलेला पैसा विकास आराखड्याच्या माध्यमातून धनिकांशी हात मिळवणी करून मोठ्या प्रमाणात वसूल करण्यात आला

Vadgoan Maval वडगाव नगरपंचायत डीपी’मध्ये ३० कोटींचा भ्रष्टाचार

वडगाव मावळ/सतिश गाडे 
 वडगाव नगरपंचायत शहराचा पुढील २० वर्षाचा नियोजित विकास साधण्यासाठी नुकताच प्रारूप विकास आराखडा प्रसिद्ध करण्यात आला असून तो पूर्णतः मनमानी पद्धतीने व आर्थिक हित साधून बिल्डर धार्जिणा बनविण्यात आला आहे. यामध्ये स्थानिक अल्पभूधारक शेतकरी व वडगावातील नागरिकांवर मोठा अन्याय करण्यात आला आहे.विकास आराखड्याच्या माध्यमातून धनिकांशी हात मिळवणी करून मोठ्या प्रमाणात वसूल करण्यात आला. यामध्ये साधारणतः ३० कोटी रुपयांचा आर्थिक भ्रष्टाचार करण्यात आला असल्यास आरोप मनसेचे माजी तालुकाध्यक्ष रुपेश म्हाळसकर यांनी पत्रकार परिषदेत केला.

पुढे बोलताना त्यांनी सांगितले  नगररचना विभागाकडून वडगाव नगरपंचायतीकडे हस्तांतरित करण्यात आलेला प्रारूप विकास आराखडा सर्व नगर सदस्यांच्या समोर खोलण्यात आला. मात्र तो विकास आराखडा प्रसिद्ध करण्यापूर्वी करण्यात आलेले ९९ बदल हे कोणत्याही सदस्याला विश्वासात न घेता व त्यांना न सांगता नगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांनी परस्पर आर्थिक हित साधून केले व ८ ऑगस्ट २०२३ रोजी नगरसेवकांची ५ वर्षांची मुदत संपल्यानंतर २६ फेब्रुवारी २०२४ रोजी सदर आराखडा प्रसिद्ध केला.

 वडगाव नगरपंचायत स्थापनेच्या पहिल्याच पंचवार्षिक काळात विकास आराखडा तयार करण्याची गरज नक्की कोणाला भासली यातून कोणाचे आर्थिक हित साधले. निवडणुकीमध्ये खर्च करण्यात आलेला पैसा विकास आराखड्याच्या माध्यमातून धनिकांशी हात मिळवणी करून मोठ्या प्रमाणात वसूल करण्यात आला. यामध्ये साधारणतः ३० कोटी रुपयांचा आर्थिक भ्रष्टाचार करण्यात आला असल्यास आरोप यावेळी त्यांनी केला ‌

वडगाव नगरपंचायत स्थापने दरम्यानच्या महाराष्ट्रातील इतर कोणत्याही नगरपंचायतीचा विकास आराखडा हा तयार झालेला नाही मग वडगावचा विकास आराखडा घाई घाई का करण्यात आला व बॉडी बरखास्तीच्या काळातच प्रसिद्ध करण्यात आला.

हे पण वाचा  ... तर मग हा मोर्चा न्यायचा कुठे?

मोनार्च एजन्सी यांनी अस्तित्वातील जमीन वापर नकाशा तयार केला असून सॅटेलाईट व प्रत्यक्ष स्थळ पाहणी सर्वे पूर्णतः चुकीचा केला आहे.केतकर समिती पुढे एकूण ६५० हरकती व सूचना मांडण्यात आल्या.  महागड्या गाड्यांमध्ये कोणकोण ये-जा करत होते, ज्या हॉटेल मध्ये मिटींग झाली त्याचे CCTV फुटेज, कॉल रेकॉर्ड तपासले पाहिजे. त्या दरम्यान अनेक मोठ्या बिल्डरांनी पैसे देऊन आरक्षण बदलून घेतला असा गंभीर आरोप यावेळी केला

जैन स्थानकावर आरक्षण टाकून अपवित्र करण्याचे काम

१६ जून २०२५ सुधारित प्रारूप विकास आराखडा प्रसिद्ध करण्यात आला. एकूण हरकती पैकी फक्त ४३ आरक्षणात बदल करण्यात आले.
पवित्र जैन स्थानकावरती काही लोकांनी आरक्षण टाकून त्यास अपवित्र करण्याचे काम केले.पावन झालेल्या याच जागेवर जैन भागवती दीक्षाचा कार्यक्रम हजारो लोकांच्या उपस्थितीत पार पडला त्याच पुण्यभूमी वरती राजकीय सूडबुद्धीने व आर्थिक फायद्यासाठी आरक्षण टाकण्यात आले.


 गावठाण हद्दीतील उप रस्त्यांची रुंदी कमी करण्यात यावी.

गणेश मंदिर ते शिवाजी चौक, रेल्वे हद्द ३० मीटर, दत्त मंदिर ते चिंचेचा गणपती वडगाव मुख्य रस्त्याची रुंदी कमी करणे वडगाव नगरपंचायत ते पंचायत समिती चौक १२ मीटर करण्यात यावा.

भ्रष्टाचाराच्या पैशातून प्रतिष्ठान, राजकारण करण्याचा प्रयत्न

 मतांच्या राजकारणासाठी जाणून बुजून काही ठिकाणी आरक्षण टाकून त्या ठिकाणचे आरक्षण काढून श्रेय लाटण्याचं काम काहीजण करत आहेत.पाच वर्षाच्या कार्यकाळातील व विकास आराखड्याच्या माध्यमातून मिळालेल्या भ्रष्टाचाराच्या पैशातून दादा व त्यांचे प्रतिष्ठान राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहे.

विकास आराखड्याच्या मनमानी कारभाराविरुद्ध जन आंदोलन उभारणार

 विकास आराखड्याच्या मनमानी कारभाराविरुद्ध जन आंदोलन उभे करून कायदेशीर लढा दिला जाईल. शहराचा विकास आराखडा तयार करत असताना कोणावरही अन्याय होणार नाही, याची दक्षता घेतली पाहिजे होती. या प्रारुप विकास आराखड्‌यावर अनेक हरकती असल्यामुळे हा प्रारुप विकास आराखडा रद्द करून नव्याने पाहणी व सर्वेक्षण करून नवीन शहर प्रारुप विकास आराखडा तयार करण्यात यावा अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने नगरपंचायतीवर मोर्चा काढण्याचा इशारा मनसेचे माजी तालुका अध्यक्ष रुपेश म्हाळसकर यांनी दिला आहे.

Tags:

About The Author

Satish Gade Picture

Correspondent, Vadgaon Maval

Advertisement

Latest News

नोटरी असोसिएशनच्या मावळ तालुकाध्यक्षपदी ॲड.अभिजीत जांभुळकर यांची  निवड नोटरी असोसिएशनच्या मावळ तालुकाध्यक्षपदी ॲड.अभिजीत जांभुळकर यांची निवड
वडगाव मावळ/ प्रतिनिधी  महाराष्ट्र अँड गोवा नोटरी असोसिएशनच्या मावळ तालुकाध्यक्षपदी ॲड अभिजीत जांभुळकर यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र विधानसभा...
जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू: सपकाळ
Vadgoan Maval वडगाव नगरपंचायत डीपी’मध्ये ३० कोटींचा भ्रष्टाचार
न्या. भूषण गवई सरन्यायाधीश होणे म्हणजे सामाजिक समतेचा विजय
हा घ्या मतचोरी केल्याचा पुरावा: अतुल लोंढे
... तर मग हा मोर्चा न्यायचा कुठे?
'... म्हणून नाकारली मनसेच्या मोर्चाला परवानगी'

Advt