- राज्य
- एअर रायफल 10 मीटर स्पर्धेत हरियाणाच्या दीपक सैनीला सुवर्ण
एअर रायफल 10 मीटर स्पर्धेत हरियाणाच्या दीपक सैनीला सुवर्ण
एजीसी स्पोर्टस पॅरा खेलोत्सव पॅरा एडिशन २०२५ दिवस सातवा
पुणे : प्रतिनिधी
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे येथे सुरू असलेल्या एजीसी स्पोर्टस पॅरा एडिशन २०२५ मध्ये रविवारी झालेल्या पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल स्टँडिंग (SH1) स्पर्धेत हरियाणाच्या दीपक सैनीने सुवर्ण पदकाची कमाई केली. तसेच या स्पर्धेत कर्नाटकाच्या राकेश एन. निदागुंडी याने रौप्य पदक तर कर्नाटकाच्याच सचिन सिद्दन्नावर याने कांस्य पदक पटकावले.
विशेष म्हणजे शेवटच्या फेरीपर्यंत अंतिम सामना चुरशीचा रंगला होता. यात हरियाणाच्या दीपक सैनीने अफलातून नेमबाजी करत सुवर्ण पदक आपल्या नावावर केले.
११ ऑगस्टपासून सुरू झालेली एजीसी स्पोर्टस पॅरा एडिशन २०२५ ही स्पर्धा पॅरा ॲथलिट्सना आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी मोठे व्यासपीठ ठरत आहे. विविध राज्यांतील पॅरा खेळाडू यात सहभागी झाले असून, त्यांच्या खेळातील जिद्दीमुळे स्पर्धेला वेगळाच रंग आला आहे.
या स्पर्धेचा समारोप उद्या, १८ ऑगस्ट रोजी होणार असून विजेत्या स्पर्धकांना बक्षिसांचे वितरण करण्यात येणार आहे. त्यामुळे अंतिम सामने पाहण्यासाठी जास्तीत जास्त पुणेकरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.