'मराठी भाषा म्हणजे संस्कृती; ती शिकणे आणि जपणे गरजेचे'

माजी मंत्री कृपाशंकर सिंह यांचे प्रतिपादन

'मराठी भाषा म्हणजे संस्कृती; ती शिकणे आणि जपणे गरजेचे'

पुणे शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात

पुणे : प्रतिनिधी

"मराठी ही केवळ भाषा नाही, ती आपली संस्कृती आहे. आपण ज्या राज्यात राहतो, त्या राज्यातील भाषा जर शिकली नाही, तर त्या भूमीची संस्कृती समजणार नाही. मराठी आपण शिकलीच पाहिजे, जपलीच पाहिजे," असे प्रतिपादन माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह यांनी केले.

पुण्यातील उदयोन्मुख चित्रपट निर्मात्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘पुनीत बालन ग्रुप’ आणि 'पायल तिवारी बिटिया फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल गुरुवारी एस. एम. जोशी सोशालिस्ट फाउंडेशन सभागृहात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.

हे पण वाचा  'ट्रम्प यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस हेच राजकारणातील जोकर'

या प्रसंगी खासदार रजनीताई पाटील, पुनीत बालन ग्रुपचे अध्यक्ष पुनीत बालन, बिटीया फाउंडेशनच्या अध्यक्षा संगीता तिवारी, अभिनेत्री स्मिता गोंदकर, ‘कोहिनूर ग्रुप’चे चेअरमन कृष्णकुमार गोयल, दूरदर्शनचे माजी अतिरिक्त संचालक मुकेश शर्मा, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ अध्यक्ष मेघराज भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा यावेळी मान्यवरांच्या हस्ते झाला.

कपाशंकर सिंह म्हणाले, "पुण्यात आयोजित शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलमधील लघुपट समाजप्रबोधन करणारे आहेत. असा महोत्सव मुंबईतदेखील झाला पाहिजे. तरुणाई समाजासाठी महत्त्वाचे संदेश देत आहे, हे कौतुकास्पद आहे."

खासदार रजनीताई पाटील म्हणाल्या, "या महोत्सवातील लघुपट हृदयाला भिडणारे आणि समाजाचे डोळे उघडणारे आहेत. ‘पुनीत बालन ग्रुप’ आणि ‘बिटीया फाउंडेशन’चे सामाजिक कार्य उल्लेखनीय आहे. असा प्रबोधनपर महोत्सव दिल्लीमध्येही घेण्याचा मानस आहे." त्यांनी लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने ‘पुनीत बालन ग्रुप’ गणेशोत्सव साजरा करीत असल्याचेही नमूद केले.

प्रास्ताविक संगीता तिवारी यांनी केले. त्यांनी सांगितले की, महोत्सवात ३०० हून अधिक सामाजिक संदेश देणाऱ्या लघुपटांनी सहभाग घेतला होता. तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग हा महोत्सवाचा मुख्य आधार होता. लघुपटांचे परीक्षण सेन दाभोलकर, झहीर दरबार, विशाल गोरे आणि सचिन दानाई यांनी केले. सूत्रसंचालन संदीप पाटील यांनी केले, तर पुनमीत तिवारी यांनी आभार मानले.

पारितोषिक विजेते :

दीड ते तीन मिनिटे गट : पहिले — संदेश वीर, दुसरे — अर्थव शालीग्राम, तिसरे — अक्षय वसकर

तीन ते चार मिनिटे गट : पहिले — तेजस पाटील, दुसरे — अक्षय वसकर, तिसरे — अक्षय भांडवलकर; विशेष — शुभम आणि सांची

पाच ते सात मिनिटे गट : पहिले — स्वप्निल गायकवाड, दुसरे — मेधा गोखले, तिसरे — अभिताभ भवर

रील गट : पहिले व दुसरे — व्यंकटेश सुंभे

विशेष उल्लेख : अक्षय वसकर , अविनाश पिंगळे, मेधा गोखले, अन्वय निरगुडकर

About The Author

Advertisement

Latest News

डॉ बबन जोगदंड बार्टीत रुजू  डॉ बबन जोगदंड बार्टीत रुजू 
पुणे : यशदा, पुणे   येथील अधिकारी  डॉ. बबन जोगदंड यांची महाराष्ट्र शासनाने प्रतिनियुक्तीने डॉ  बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था...
'आधार प्रमाणीकरणातील अडचणींवर उपाययोजना कराव्यात'
एकात्मतेसाठी बलिदान देणाऱ्यांप्रती निष्ठा राखणे हेच खरे भारतीयत्व
'... आणि जनता घरी बसणाऱ्यांना घरी बसवणार'
'... तर कितीही जण एकत्र आले तरी भोपळे मिळणार'
‘द गोल्ड रश’ला पुणे व लातूर येथे प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद
मावळ विचार मंच आयोजित सरस्वती व्याख्यानमालेच्या अध्यक्षपदी गुलाबराव म्हाळसकर यांची निवड

Advt