- राज्य
- मावळ विचार मंच आयोजित सरस्वती व्याख्यानमालेच्या अध्यक्षपदी गुलाबराव म्हाळसकर यांची निवड
मावळ विचार मंच आयोजित सरस्वती व्याख्यानमालेच्या अध्यक्षपदी गुलाबराव म्हाळसकर यांची निवड
वडगाव मावळ/ प्रतिनिधी
मावळ विचार मंच आयोजित सरस्वती व्याख्यानमालेच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या अध्यक्षपदी मावळ पंचायत समितीचे माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
कार्याध्यक्षपदी अजित देशपांडे , उपाध्यक्षपदी ॲड.दामोदर भंडारी , कार्यक्रम प्रमुख पदी धनश्री भोंडवे आणि प्रिया राऊत, सचिव पदी गिरीश गुजराणी, खजिनदार पदी संतोष भालेराव आणि प्रसिद्धी प्रमुखपदी अतुल म्हाळसकर यांची निवड करण्यात आली.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भास्करराव म्हाळसकर आणि कार्याध्यक्ष डॉ.रवींद्र आचार्य यांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवड करण्यात आली.भास्करराव म्हाळसकर यांनी नूतन कार्यकारिणीची घोषणा करत २५ व्या वर्षी संपन्न होणाऱ्या सरस्वती व्याख्यानमालेच्या कार्यक्रमाची व्यापक संकल्पना विशद केली.
डॉ.रविंद्र आचार्य यांनी आपल्या मनोगतात नूतन कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या.नूतन अध्यक्ष गुलाबराव म्हाळसकर यांनी सर्वांना सोबत घेऊन अधिकाधिक दर्जेदार कार्यक्रम करणार असल्याची ग्वाही दिली.
उपस्थित सर्व सदस्यांनी कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत आपापली मते मांडली.वडगांव विविध कार्यकारी सोसायटी चे चेअरमन नारायण ढोरे , वडगांव शहर भाजपा अध्यक्ष संभाजी म्हाळसकर , मावळ विचार मंचाचे संचालक बाळासाहेब बोरावके , अरुण वाघमारे, भूषण मुथा , शंकरराव भोंडवे , दीपक भालेराव , कल्पेश भोंडवे, अतुल राऊत, अतिश ढोरे , कुलदीप ढोरे , अमोल ठोंबरे , सुयश म्हाळसकर , दीपक शास्त्री महिला संयोजन समितीच्या संचालक हर्षदा दुबे , वैशाली ढोरे , भक्ती जाधव , श्रेया भंडारी , सुवर्णा गाडे , कांचन ढमाले , साक्षी जोगळेकर , स्वाती मोहिरे , सुषमा जैन आदी उपस्थित होते.
रौप्य महोत्सवी सरस्वती व्याख्यानमाला घटस्थापना सोमवार दि. २२ सप्टेंबर ते बुधवार दि. १ ऑक्टोबर २०२५ या दरम्यान संपन्न होणार असून गुरुवार दि. २ ऑक्टोबर रोजी विजयादशमी ( दसरा ) निमित्त श्री भारतमाता प्रतिमेची भव्य मिरवणूक संपन्न होईल अशी माहिती संस्थापक अध्यक्ष भास्करराव म्हाळसकर यांनी दिली.
About The Author
