जागतिक लठ्ठपणा दिनानिमित्त जनजागृती 

जागतिक लठ्ठपणा दिनानिमित्त जनजागृती 

मुंबई / रमेश औताडे 

स्थूलपणा हे अनेक आजारांचे प्रमुख कारण आहे. हृदयाचे आजार, मधुमेह आणि काही प्रकारचे कॅन्सर स्थूलपणामुळे होतात. अनेक गंभीर गुंतागुंतीच्या समस्या शरीरात निर्माण होतात. त्यामुळे स्थूलपणावर उपाय करणे हे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी नव्हे तर प्राणघातक आजारांना आळा घालण्यासाठी  महत्त्वाचे आहे. अशी माहिती डॉ संजय खरे यांनी जागतिक लठ्ठपणा दिनाच्या पार्श्वभूमीवर दिली.  

मुलांमध्ये स्थूलपणा वाढत आहे, ही अजूनच चिंताजनक बाब आहे. भारतामध्ये ५ ते १९ वर्षे वयाची जवळपास १२.५ मिलियन मुले २०२२ मध्ये स्थूलपणाने ग्रस्तस्त होती. ही आकडेवारी जगात सर्वात जास्त आहे आणि १९९० पासून यामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. स्थूलपणा भारतातील शहरी आणि निम-शहरी भागांमध्ये वाढत असलेली एक साथ आहे असे अपोलो हॉस्पिटल्सचे अरुणेश पुनेथा यांनी सांगितले.

आहार तज्ञ, मनोवैज्ञानिक, फिजिओथेरपिस्ट आणि वेलनेस विशेषज्ञ यांनी सुसज्ज असणारे अपोलोचे क्लिनिक वजन कमी करण्यासाठी मार्गदर्शन करणार आहे. प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ, साखर मिसळलेली कोल्ड्रिंक्स यांचा वाढता खप, मोबाईल टीव्ही स्क्रीनवर खूप जास्त वेळ घालवणे आणि शारीरिक हालचाली खूपच कमी करणे ही या समस्येची प्रमुख कारणे आहेत असे.

हे पण वाचा  Vadgoan Maval वडगाव मावळ नगरपंचायतीकडून प्रभाग रचनेची प्रक्रिया सुरू 

000

About The Author

Advertisement

Latest News

आमदार, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, सिईओ यांचे स्वागताने भारवले विद्यार्थी ..! आमदार, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, सिईओ यांचे स्वागताने भारवले विद्यार्थी ..!
सोलापूर - फुग्यांनी सजविलेल्या स्वागत कमानी…! बाळाचे पाय कलर मध्ये बुडवून पायाचे ठसे घेणेत दंग असलेल्या शिक्षिका…! शाळेत पहिले पाऊल...
गुलाब पुष्प आणि रेवडी देऊन महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे स्वागत
नैसर्गिक ओढे नाले बुजवल्यामुळे केसनंद मध्ये घराघरात पाणी घुसले....
डी डेव्हलपमेंट इंजिनीअर्स लिमिटेडतर्फे श्रुती अगरवाल यांची पूर्णवेळ संचालकपदावर पदोन्नती
डायलसिस उपचार आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात
जागतिक लठ्ठपणा दिनानिमित्त जनजागृती 
शेतकऱ्यांच्या थकबाकी बिलासाठी पुन्हा उपोषण

Advt