आमदार, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, सिईओ यांचे स्वागताने भारवले विद्यार्थी ..!

आमदार, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, सिईओ यांचे स्वागताने भारवले विद्यार्थी ..!

सोलापूर - फुग्यांनी सजविलेल्या स्वागत कमानी…! बाळाचे पाय कलर मध्ये बुडवून पायाचे ठसे घेणेत दंग असलेल्या शिक्षिका…! शाळेत पहिले पाऊल ठेवणे साठी बालकांची व पालकांची धडपड….विद्यार्थ्यांच्या स्वागता साठी चक्क आमदार, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त व जिल्हा परिषदेचे सिईओ उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे स्वागत केल्यामुळे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील वातावरण बदलून गेले.

जमिनीवर बसून जिल्हाधिकारी आशिर्वाद यांनी केले विद्यार्थांचे स्वागत

जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी देगाव येथील प्राथमिक शाळेत जाऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. जिल्हाधिकारी स्वतः हून शाळेत स्वागता साठी हजर झाले. जिल्हाधिकारी उंचीने मोठे असल्यामुळे लहान बालकांच्या बरोबरीने फोटो घेणे साठी जिल्हाधिकारी यांनी जमिनीवर बसून विद्यार्थ्यांसमवेत फोटो घेतले. जिल्हाधिकारी आशिर्वाद यांनी  नवागतांशी  हितगुज साधत संवाद साधला.  जिल्हाधिकारी यांचे प्रेमाने विद्यार्थी भारावून गेले. या प्रसंगी शिक्षणाधिकारी कादर शेख उपस्थित होते. 

सिईओ कुलदीप जंगम यांनी सेल्फी घेऊन केले विद्यार्थ्यांचे स्वागत ..!

हे पण वाचा  रसिकांनी अनुभवले परिपक्व ध्रुपदगायन आणि रंगतदार ख्यालगायन

जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम सोमवारी शाळा प्रवेशोत्सव निमित्त  मोहोळ तालूक्यातील पापरी शाळेस भेट  दिली. जंगम यांनी  इ .1 ली च्या नवागत विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करून मुलांमध्ये मिसळून सेल्फी काढला. नवागत विद्यार्थ्यांना पावलांचे ठसे पालकांना वाटप केल्यामुळे पालक खुश दिसून येत होते. 

पापरी शाळेच्या प्रांगणात आज नवागत विद्यार्थ्यांचे स्वागताच्या कार्यक्रमाचे आयोजन करणेत आले होते.  या प्रसंगी  गटविकास अधिकारी विवेक जमदाडे, उपशिक्षणाधिकारी ढेपे , विस्तार अधिकारी स्वामी , या कार्यक्रमा प्रसंगी सरपंच सौ. जयश्री कोळी उप सरपंच  अमोल भोसले , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र शेळके ,  उपाध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती चे उपाध्यक्ष नितीन भोसले,  शाळा व्यवस्थापन समिती तसेच पद्माकर भोसले, नारायण सदस्य ,.संभाजी भोसले, मोनाली चौधरी. प्रणिती प्रताप भोसले,कामिनी मेटकरी व सर्व पालक उपस्थित होते.

पापरी शाळेचा पॅटर्न ..!

पापरी शाळे लोकवर्गणीतून नवागतांना गणवेश, पुस्तके, बूट - सॉक्स वाटपाचे नियोजन केले होते. पापरी शाळेने केलेली विविध लोकोपयोगी कामांचे सादरीकरण करणेत आले. या प्रसंगी सर्व शालेय पूर्वतयारी व प्रवेशोत्सव पाहून शाळेचे अभिनंदन केले. या प्रसंगी सिईओ कुलदीप जंगम यांचे हस्ते वृक्षारोपण करणेत आले.

पापरी  जिल्हा परिषदे शाळेच्या पटाची  १ हजारा कडे वाटचाल …!

सोलापूर जिल्ह्यात खाजगी शाळांची संख्या वाढत असताना मोहोळ तालुक्यातील पापरी  जिल्हा परिषदेच्या शाळेतील पट  संख्या 824 झाली आहे. या शाळेतील पट संख्या एक हजार करणेचा मानस जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांनी केला आहे. सध्या 1000  विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली आहे. या बद्दल  वर्गशिक्षकांचे व मुख्याध्यापकांचे सिईओ जंगम यांनी अभिनंदन केले.

पोलिस आयुक्त राजकुमार यांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत

जिल्हा परिषद शाळा मजरेवाडी येथे सोलापूर शहर पोलिस आयुक्त राज कुमार यांनी नवागत विद्यार्थ्यांचे गुलबापुष्प देऊन स्वागत केले. जिल्हा परिषद शाळेत आयुक्त स्वागता साठी आल्याने पालक व शिक्षकांच्या आनंदाला पारवार उरला नाही.

विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी सरसावले आमदार .. !

आमदार सुभाष देशमुख यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील इंगळगी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस भेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करून वृक्षारोपण केले. तर मोहोळचे आमदार राजू खरे यांनी मोहोळ तालुक्यातील — येथील प्राथमिक शाळेत जाऊन नवागतांचे स्वागत केले. बाळे येथील प्राथमिक शाळेत आमदार विजयकुमार देशमुख यांनी विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. बार्शी तालुक्यातील उपळाई ढोंगे येथे बार्शी चे आमदार दिलीप सोपल यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. सांगोलाचे  आमदार डॉ बाबासाहेब देशमुख यांच्या सुविद्य पत्नी डॉ सौ निकिता देशमुख यांच्या हस्ते पेनूर शाळेत इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.

000

Tags:

About The Author

Advertisement

Latest News

आमदार, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, सिईओ यांचे स्वागताने भारवले विद्यार्थी ..! आमदार, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, सिईओ यांचे स्वागताने भारवले विद्यार्थी ..!
सोलापूर - फुग्यांनी सजविलेल्या स्वागत कमानी…! बाळाचे पाय कलर मध्ये बुडवून पायाचे ठसे घेणेत दंग असलेल्या शिक्षिका…! शाळेत पहिले पाऊल...
गुलाब पुष्प आणि रेवडी देऊन महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे स्वागत
नैसर्गिक ओढे नाले बुजवल्यामुळे केसनंद मध्ये घराघरात पाणी घुसले....
डी डेव्हलपमेंट इंजिनीअर्स लिमिटेडतर्फे श्रुती अगरवाल यांची पूर्णवेळ संचालकपदावर पदोन्नती
डायलसिस उपचार आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात
जागतिक लठ्ठपणा दिनानिमित्त जनजागृती 
शेतकऱ्यांच्या थकबाकी बिलासाठी पुन्हा उपोषण

Advt