डायलसिस उपचार आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात

जगातील पहिल्या ए आय मशीन द्वारे स्वदेशी उपचार

डायलसिस उपचार आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात

मुंबई / रमेश औताडे 

ग्रामीण भागातील व शहरी भागातील रुग्णांना डायलसिस उपचार परवडणारे नसतात. त्यामुळे अनेक रुग्णांना जीव गमवावा लागतो. या सर्व पार्श्वभूमीवर रेनलिक्स या जगातील पहिल्या स्वदेशी मशीन द्वारे सामान्य नागरिकांना आता डायलसिस उपचार माफक दरात मिळणार आहेत. अशी माहिती पत्रकार परिषदेत कंपनीचे संस्थापक संचालक डॉ. शाम वासुदेव राव यांनी दिली.

यावेळी बोलताना राव म्हणाले, ग्रामीण भारत आजही अनेक वैद्यकीय सोयी सुविधा नसल्याने मागास आहे. जगात वेगाने क्रांती      होत आहे. आमची कंपनी पुढील चार वर्षासाठी उत्पादन वाढविण्यासाठी ८०० कोटींची समभाग विक्री करणार आहे. यावेळी कंपनीचे पदाधिकारी सुरेश बी, रामन वेंकट, श्रीनाथ एच पी उपस्थित होते.

मूत्रपिंड आजार, हृदय व रक्तवाहिन्या, फूफस या व इतर आजारावर ग्रामीण भागातील रुग्णांना याचा जास्त लाभ होणार आहे. अचूक व लवकर उपचार होण्यासाठी ए आय असणारे हे मशीन महत्वाची भूमिका बजावणार आहे. शहरी भागातील रुग्ण एकत्र येऊन सामाजिक संस्थांच्या माध्यमातून हे मशीन विकत घेऊ शकतात.असे  डॉ. शाम वासुदेव राव यांनी सांगितले.

हे पण वाचा  'शहर बदलू शकतं; पण सुरुवात आपल्यालाच करावी लागेल!'

000

Tags:

About The Author

Advertisement

Latest News

आमदार, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, सिईओ यांचे स्वागताने भारवले विद्यार्थी ..! आमदार, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, सिईओ यांचे स्वागताने भारवले विद्यार्थी ..!
सोलापूर - फुग्यांनी सजविलेल्या स्वागत कमानी…! बाळाचे पाय कलर मध्ये बुडवून पायाचे ठसे घेणेत दंग असलेल्या शिक्षिका…! शाळेत पहिले पाऊल...
गुलाब पुष्प आणि रेवडी देऊन महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे स्वागत
नैसर्गिक ओढे नाले बुजवल्यामुळे केसनंद मध्ये घराघरात पाणी घुसले....
डी डेव्हलपमेंट इंजिनीअर्स लिमिटेडतर्फे श्रुती अगरवाल यांची पूर्णवेळ संचालकपदावर पदोन्नती
डायलसिस उपचार आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात
जागतिक लठ्ठपणा दिनानिमित्त जनजागृती 
शेतकऱ्यांच्या थकबाकी बिलासाठी पुन्हा उपोषण

Advt