डी डेव्हलपमेंट इंजिनीअर्स लिमिटेडतर्फे श्रुती अगरवाल यांची पूर्णवेळ संचालकपदावर पदोन्नती

डी डेव्हलपमेंट इंजिनीअर्स लिमिटेडतर्फे श्रुती अगरवाल यांची पूर्णवेळ संचालकपदावर पदोन्नती

नवी दिल्ली : प्रगत प्रक्रिया पाइपिंग सेवा पुरवणारी आघाडीची कंपनी डी डेव्हलपमेंट इंजिनीअर्स लिमिटेडने (DDEL) श्रुती अगरवाल यांची 14 एप्रिल 2025 पासून कंपनीच्या पूर्णवेळ संचालक म्हणून 5 वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्ती झाल्याची घोषणा केली आहे.

 

या भूमिकेअंतर्गत त्या कंपनीच्या आर्थिक धोरण, नियोजन आणि अनुपालनाची जबाबदारी सांभाळतील तसेच डेटा-आधारित माहितीद्वारे कार्यात्मक निर्णय प्रक्रियेला सहाय्य करतील. पूर्णवेळ संचालक म्हणून, श्रुती या माळवा पॉवर प्रायव्हेट लिमिटेड आणि डी फॅब्रीकॉम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालक मंडळावरही काम करत राहतील. त्यायोगे त्या संपूर्ण समूहाच्या धोरणात्मक दिशा आणि आर्थिक प्रशासकीय व्यवस्थेमध्ये योगदान देतील.

 

या घडामोडीवर भाष्य करताना डी डेव्हलपमेंट इंजिनीअर्स लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कृष्णन ललित बंसल म्हणाले, “श्रुती या अनेक वर्षांपासून डी डेव्हलपमेंटचा अविभाज्य भाग राहिल्या आहेत आणि ही पदोन्नती म्हणजे त्यांच्या निष्ठा आणि नेतृत्वाला मिळालेली पावती आहे. त्यांना आमच्या मूल्यांची, आमच्या लोकांची आणि आम्हाला जोडणाऱ्या हेतूची उत्कृष्ट समज आहे. त्यांच्या नव्या भूमिकेत त्या शाश्वत वाढीला चालना देतील आणि आमच्या सर्व भागधारकांसाठी अद्वितीय मूल्य निर्माण करत राहतील याची मला खात्री आहे.”

 

आर्थिक नियोजन, अंदाजपत्रक, कामकाज आणि व्यवस्थापन अहवाल सादरीकरणात 13 वर्षांहून अधिक अनुभव असलेल्या श्रुती यांनी आर्थिक विभागाला व्यवसायाच्या उद्दिष्टांशी सुसंगत राखण्यात उत्कृष्ट यश मिळवले आहे. पूर्णवेळ संचालक या नव्या भूमिकेसोबत त्या कंपनीच्या प्रवर्तक समूहाचा भाग असून 2011 पासून डी सोबत कार्यरत आहेत. याआधी त्या उपाध्यक्ष (कामकाज) म्हणून कार्यरत होत्या.

 

डी डेव्हलपमेंट इंजिनीअर्स लिमिटेडच्या पूर्णवेळ संचालक श्रुती अगरवाल म्हणाल्या, “संचालक मंडळाने माझ्यावर सोपवलेल्या या जबाबदारीबद्दल मी त्यांची आभारी आहे. डी डेव्हलपमेंटमाझ्यासाठी केवळ एक कार्यस्थळ नाही तर ते शिकण्याचं, वाढीचं आणि सामूहिक उद्दिष्टांचं स्थान राहिलं आहे. या नव्या भूमिकेत काम करायला सुरुवात करताना जागतिक दर्जाच्या अभियांत्रिकी सुविधा पुरवत आम्ही एकत्रपणे निर्माण केलेल्या गोष्टी अधिक मजबूत करण्यावर मी लक्ष केंद्रित करेन. त्याचवेळी उच्चतम नैतिकता, प्रामाणिकपणा आणि उत्कृष्टतेची मूल्यं जोपासेन. आपल्या व्यवसायाच्या सर्व पैलूंमध्ये उत्कृष्टता साध्य करण्यासाठी मी आमच्या टीमसोबत जवळून काम करण्यास उत्सुक आहे.”

 

त्यांनी दिल्ली विद्यापीठातून वाणिज्य शाखेतील पदवी घेतली असून त्या ICFAI, त्रिपुराच्या  चार्टर्ड फायनान्शियल अ‍ॅनालिस्ट आहेत. त्यांनी श्रीराम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट येथून PGDM (फायनान्स) पूर्ण केले आहे.

 

000

Tags:

About The Author

Related Posts

Advertisement

Latest News

Advt