शशांक हगवणे याची भामटेगिरी उघड

जेसीबी जप्त करणारे बँक अधिकारी तोतया, तिघांना अटक

शशांक हगवणे याची भामटेगिरी उघड

पुणे: प्रतिनिधी

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी हगवणे कुटुंबीयांच्या रोज नवनवीन करामती उघड होत आहेत. वैष्णवी यांच्या मृत्यूनंतर त्यांचा पती शशांक याच्यावर फसवणुकीचा एक गुन्हा दाखल झाला आहे. जेसीबी खरेदी विक्रीच्या या प्रकरणात शशांक याने तिघा तोतया बँक अधिकाऱ्यांना पाठवून जेसीबी जप्त करण्याचे नाटक केल्याचे उघड झाले आहे. या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. 

जेसीबी खरेदीच्या व्यवहारात शशांक हगवणे यांनी आपली फसवणूक केल्याची तक्रार प्रशांत येळवंडे यांनी केली आहे. या प्रकरणात शशांक याच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. येळवंडे आणि हगवणे यांच्यात पंचवीस लाख रुपयांना जेसीबीचा व्यवहार ठरला होता. येळवंडे यांनी शशांक याला सुरुवातीला पाच लाख रुपये दिले. त्यानंतर दरमहा बँकेचा हप्ता भरण्यासाठी पन्नास हजार रुपये दिले. मात्र, हे हप्ते बँकेत न भरल्यामुळे बँकेने जेसीबी जप्त करून नेला व शशांकने तो सोडवून आणला. 

प्रत्यक्षात जप्तीचे हे केवळ नाटकच करण्यात आल्याचे पोलिसांनी केलेल्या चौकशीत आढळून आले आहे. जेसीबी जप्त करण्यासाठी आलेले तिघेजण हे बँकेचे अधिकारी असल्याचे नाटक करणारे तोतया होते. या तिघांनी अनाधिकाराने येळवंडे यांच्याकडून जेसीबी ताब्यात घेतला आणि तो शशांकच्या ताब्यात दिला. याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी आज पहाटे योगेश राजेंद्र रासकर (वय २५, रा. तळेगाव ढमढेरे),  गणेश रमेश पोतले (वय ३०, रा. मोहितेवाडी), वैभव मोहन पिंगळे (वय २७, रा. तळेगाव ढमढेरे) यांना अटक केली. 

हे पण वाचा  मुख कर्करोग दिनानिमित जनजागृती अभियान

About The Author

Advertisement

Latest News

शिव शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा स्मरण करून सर्वांनी पुढे गेले पाहिजे-उपमुख्यमंत्री अजित पवार शिव शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा स्मरण करून सर्वांनी पुढे गेले पाहिजे-उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे - छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श व कर्तुत्वाची सर्वांनी आठवण ठेवून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ....
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांनी दिली बार्टी संस्थेस भेट
दिव्यांगाची परवड थांबणार कधी; दिव्यांग व्यक्ती संघटनेचे पदाधिकारी ज्ञानदेव कदम!
नॅशनल पार्क झोपडीवासीयांचा वनवास २५ वर्षे झाली तरी संपेना 
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन साजरा  
स्वेच्छेने केलेल्या धर्मांतराला विरोध नसावा: सरसंघचालक
जगद्गुरु तुकोबाराय यांची पालखी बोपोडीत अधिक काळ विसावणार

Advt