अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील त्रुटींबाबत; हिंदू महासंघाचे शिक्षणमंत्र्याना निवेदन
विद्यार्थी हितासाठी आक्रमक होण्याचा इशारा
पुणे : अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील त्रुटींबाबत हिंदू महासंघाच्या पालक आघाडीने शिक्षणमंत्री दादा भुसे यांची मुंबई निवासस्थानी भेट घेऊन निवेदन दिले. पालक आघाडीच्या प्रतिनिधींसह हिंदू महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आनंद दवे , आदिती जोशी, तृप्ती तारे, नितीन शुक्ल,अजित जोशी, तृप्ती वाकडे, अश्विन वाकडे,कविता दोशी आणि आरती जोशी उपस्थित होते.यावेळी ११ वीच्या प्रवेशाच्या जी.आर. मध्ये आवश्यक बदल करण्याबाबत चर्चा करण्यात आली. शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी पालक आघाडीला सकारात्मक आश्वासन दिले आहे.परंतु ३ जून २०२५ पर्यंतच प्रवेश प्रक्रियेची मुदत असल्यामुळे पालक आघाडी मागणीबाबत आक्रमक राहणार आहे.
सीईटीप्रमाणे प्रवेशप्रक्रिया सुलभ असल्याचे सांगीतले जात आहे. मात्र प्रत्यक्षात अडचणी येत आहेत. प्रवेश प्रक्रियेतील अर्ज भरण्याकरिता असलेले संकेतस्थळ बिघडते. विद्यार्थ्यांच्या शाळेच्याच असलेल्या महाविद्यालयाचे संकेत स्थळावर दिसतच नाही. रहिवासी असलेल्या ठिकाणापासून जवळ असलेले महाविद्यालय देखील संकेत स्थळावर दिसत नाही. महाविद्यालयात असलेला प्रशासकीय जागा देखील शासकिय जागा शासनाकडे जमा झाल्याने महाविद्यालयांकडे पर्याय शिल्लक नाही.या सर्व अडचणीमुळे विद्यार्थ्यांबरोबरच पालक चिंताग्रस्त झाले असून संतप्त प्रतिक्रिया सर्व स्तरातून येत आहेत.चांगले गुण असले तरी प्रवेश प्रक्रिये मुळे चांगले महाविद्यालय मिळण्याची खात्री उरलेली नाही.हिंदू महासंघाने या विषयाकडे लक्ष देऊन राज्यभर पालक आणि विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून येत्या काळात न्यायासाठी संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
000