शिक्षकांनी विज्ञानाचे प्रसारक व्हावे - डॉ.विष्णू लाल
On
नारायणगाव, किरण वाजगे
विद्यार्थ्यांमधील जिज्ञासेला वाव द्या,त्यांच्या प्रश्नांना समजून घ्या,विज्ञानासंबंधीचे कुतूहल जागृत करा,ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड गुणवत्ता असून आपण एकत्रितपणे ही गुणवत्ता राष्ट्र उभारणीसाठी विकसित करायला हवी. यासाठी शिक्षकांनी विज्ञानाचे प्रसारक व्हावे असे मनोगत इस्रो ग्रुपचे संचालक डॉ. विष्णू लाल यांनी व्यक्त केले
श्रीमंत योगी सुवर्ण स्मारक ट्रस्ट शिवजन्मभूमी जुन्नर, तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे इस्रो केंद्र, इंडोसायन्स एज्युकेशन ट्रस्ट- इसरो अंतराळ प्रशिक्षक यांच्यावतीने व आमदार शरद सोनवणे यांच्या संकल्पनेतून ग्रामोन्नती मंडळाचे गुरुवर्य रा.प. सबनीस विद्यामंदिरात 'आर्यभट्ट एक्सप्लोरर्स कॅम्प' अंतर्गत जुन्नर तालुक्यातील शिक्षकांसाठी आयोजित केलेल्या शिक्षक कार्यशाळेत डॉ. लाल बोलत होते.
यावेळी शिक्षण तज्ञ डॉ. पूनम लाल, इंडो सायन्स एज्युकेशन ट्रस्टचे संस्थापक- अध्यक्ष संतोष पिसे, मार्गदर्शक अनुज लोंढे, शिबिर समन्वयक संतोष घोटणे आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यशाळेत डॉ. विष्णु लाल,पूनम लाल, संतोष पिसे,अनुज लोंढे यांनी विज्ञानातील विविध शैक्षणिक संधी,समस्या व उपाय या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत शिक्षकांनी प्रश्नउत्तराद्वारे सक्रिय सहभाग घेतला.
शिक्षकांची ही कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी गटशिक्षणाधिकारी अमोल जंगले, गटविकास अधिकारी विठ्ठल भोईर यांनी विशेष प्रयत्न केले. या कार्यशाळेचे सूत्रसंचालन संतोष पिसे यांनी केले व आभार संतोष घोटणे यांनी मानले. कार्यशाळेत भारताचे प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ दिवंगत डॉ. जयंत नारळीकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
000
Tags:
About The Author
Latest News
02 Jun 2025 19:21:54
अभिनेते सयाजी शिंदेंचा अभिनव उपक्रम