टेंभुर्णीत महाराज महाराजस्व अभियानांतर्गत ३ हजार दाखले निकाली!

टेंभुर्णीत महाराज महाराजस्व अभियानांतर्गत ३ हजार दाखले निकाली!

टेंभुर्णी/ प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान उत्सव योजनाचा या उपक्रमानिमित्त माढा तहसील यांच्या वतीने  टेंभुर्णी येथे घेण्यात आलेल्या शिबिरात महसूल, आरोग्य, कृषी, पशुधन व ग्रामपंचायत असे मिळून ३ हजार दाखले एका दिवसात निकाली काढण्यात आले. या कार्यक्रमाचे उदघाटन आमदार अभिजीत पाटील, तहसीलदार शिल्पा ठोकडे यांचे हस्ते झाले. 

यावेळी नायब तहसीलदार पांडुरंग भडकवाड, सरपंच सुरजा बोबडे, भारत पाटील, राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष सुरज देशमुख, मा. सरपंच प्रमोद कुटे, वैभव कुटे, रावसाहेब देशमुख,औदुंबर महाडिक, बाळासाहेब ढवळे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते. 

विद्यार्थ्यांना लागणारे शैक्षणिक दाखले व इतर दाखले काढण्यासाठी वेळ जातो अनेक,तसेच अनेक कार्यालयांमध्ये हेलपाटे मारावे लागतात हे सर्व टाळण्यासाठी व पालक, वयोवृद्ध यांना होणारा नाहक त्रास टाळून  सदर कार्यक्रमांमध्ये महसूल विभाग, ग्रामपंचायत विभाग, कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग, आरोग्य विभाग, भूमी अभिलेख विभाग, महावितरण विभाग यांचे वतीने संबंधित विभागाकडे असणाऱ्या शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला. यामध्ये १७८ जातीचे दाखले, ९७ नॉन क्रिमिलेयर, २५८ उत्पन्न, २८९ डोमासाईल, ३० रेशन कार्ड मधून नाव कमी करणे, ८७ नवीन तसेच ९५ दुबार रेशन कार्ड प्रस्ताव, पोट खराब क्षेत्र लायक करणेबाबतचे १४ आदेश, ४२ ड च्या ७९ सनद, संजय गांधी व श्रावण बाळ योजना ४०५ अर्ज असे एकूण १५७४ अर्ज निकाली निघाले, आरोग्य विभागामार्फत १२४६ तसेच कृषी विभागामार्फत ४ ट्रॅक्टर योजना, महावितरण विभागामार्फत २ नवीन वीज जोडणी, ७ पीएम सूर्यघर योजना, १५ मागेल त्याला सोलर योजना, पशुसंवर्धन विभागामार्फत १५ पशूंचे लसीकरण व ग्रामपंचायत विभागामार्फत १०९ जॉब कार्डचे प्रस्ताव दाखल करणे तसेच वाटप करण्यात आले. यावेळी माननीय विजया पांगारकर उपविभागीय अधिकारी माढा विभाग कुर्डवाडी यांनी भेट दिली. यावेळी सचिन जगताप, सतीश नेवसे, गौतम कांबळे, सचिन होदाडे, बलभीम लोंढे, गणेश केचे, बाळासाहेब ढगे, प्रताप गायकवाड, सोमनाथ ताबे, शैलेश ओहोळ, आप्पा हवलदार, हरिभाऊ सटाले, रामभाऊ वाघमारे,संदीप मोकाशी, विजय कोकाटे, यशपाल लोंढे आदी  उपस्थित होते. तसेच टेंभुर्णी मंडळातील सर्व पोलीस पाटील, सर्व ग्रामसेवक व इतर शासकीय कर्मचारी सदर कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते.

हे पण वाचा  'आनंद साजरा करतानाच जबाबदारीचे भान ठेवा'

000

About The Author

Advertisement

Latest News

सोमाटणे व वरसोली टोलनाक्यांवरील अनियमिततेबाबत आमदार शेळके यांनी सरकारला धरले धारेवर सोमाटणे व वरसोली टोलनाक्यांवरील अनियमिततेबाबत आमदार शेळके यांनी सरकारला धरले धारेवर
वडगाव मावळ/ प्रतिनिधी  टोलनाक्यांच्या अनियमिततेवर मावळचे आमदार सुनील शेळके यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडून सरकारचे लक्ष वेधले. जुना पुणे-मुंबई राष्ट्रीय...
मावळ तालुक्यातील लाचखोर मंडलाधिकारी एसीबीच्या जाळ्यात; २ लाखांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले
शिवसेना शिंदे गट आणि रिपब्लिकन सेना यांची युती
'माझ्याही कुंकवाला न्याय द्या'
रस्त्यांच्या दुरवस्थेवर मावळचे आमदार सुनील शेळके आक्रमक; तातडीने खड्डे बुजवण्याची सरकारकडे मागणी
'चड्डी बनियन गँग हाय हाय, गुंडाराज सरकारचं करायचं काय?'
समारोपाचे भाषण करताना जयंत पाटील भावूक

Advt