Narayangaon News | दुय्यम निबंधक कार्यालय स्थलांतरित होऊ देणार नाही

वारूळवाडी ग्रामस्थांचे उपोषण सुरू

Narayangaon News | दुय्यम निबंधक कार्यालय स्थलांतरित होऊ देणार नाही
नारायणगाव, किरण वाजगे
 
नारायणगाव येथील दुय्यम निबंधक कार्यालय स्थलांतरित होऊ नये तसेच ते वारूळवाडी गावच्या हद्दीतच राहावे यासाठी वारूळवाडी येथे उपोषण सुरू करण्यात आले आहे.  हे कार्यालय खाजगी बिल्डरच्या स्वतःच्या स्वार्थासाठी व आर्थिक फायद्यासाठी हलवले जात असल्याच्या निषेधार्थ कार्यालयाच्या शेजारीच दोन जणांनी सोमवार दि. २६ पासून आमरण उपोषण सुरू केले आहे. 
 
1000280762
 
सामाजिक कार्यकर्ते शशिकांत पारधी व नितीन भालेराव हे दोघेजण उपोषणाला बसले असून येथील सरपंच विनायक भुजबळ, जिल्हा दूध संघाचे माजी अध्यक्ष रमेश भुजबळ, उद्योजक संजय वारुळे, विकास सोसायटीचे माजी चेअरमन आशिष फुलसुंदर, माजी उपसरपंच जंगल कोल्हे, शेतकरी संघटनेचे रमेश शिंदे, सचिन आडसरे, चैतन्य खांडगे, पांडू फुलसुंदर, रामदास भुजबळ, बाळासाहेब भुजबळ, दीपक भुजबळ, वरूण भुजबळ व इतर कार्यकर्ते साखळी उपोषणाला बसले आहेत.
 
1000282546
 
येथील दुय्यम निबंधक कार्यालय हे हलवण्याचा प्रयत्न करण्यात येत असून खाजगी बिल्डरच्या स्वार्थासाठी व आर्थिक फायद्यासाठी हे कार्यालय येथून हलवण्यात येऊ नये असे पत्र वरिष्ठ कार्यालयाकडून जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा पवित्रा येथील उपोषणकर्त्यांनी घेतला आहे. दरम्यान नारायणगाव येथील सामाजिक कार्यकर्त्या कनिका कपिल खैरे यांनी देखील दुय्यम निवेदन कार्यालय हे खाजगी जागेत जाऊ देणार नाही असा इशारा दिला आहे. याबाबत प्रभारी दुय्यम निबंधक गणेश भागवत यांच्याशी संपर्क केला असता याबाबत वरिष्ठ कार्यालय निर्णय घेणार असून आपल्याला याविषयी अधिक माहिती नाही असे सांगितले.
 
000
Tags:

About The Author

Advertisement

Latest News

दुय्यम निबंधक कार्यालयाच्या स्थलांतराबाबत उपोषणामुळे बसलेल्या कार्यकर्त्यांची तब्येत खालावली! दुय्यम निबंधक कार्यालयाच्या स्थलांतराबाबत उपोषणामुळे बसलेल्या कार्यकर्त्यांची तब्येत खालावली!
नारायणगाव   नारायणगाव येथील दुय्यम निबंधक कार्यालय स्थलांतरित होऊ नये तसेच ते वारूळवाडी गावच्या हद्दीतच राहावे यासाठी वारूळवाडी येथे उपोषण सुरू...
पाकव्याप्त काश्मीर भारताच्या ताब्यात घ्यावा ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
मातंग समाजाच्या मागण्यांवर लवकरच निर्णय - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पैशाच्या लोभासाठी क्रौर्याची परिसिमा!
सन्मानजनक मानधनासाठी ज्युनिअर आर्टिस्ट आक्रमक
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना अमेरिकन न्यायालयाने लावला चाप
दुष्काळग्रस्त गरजू विद्यार्थ्यांची यादी सरकारने मागवली

Advt