- राज्य
- रत्नागिरी जिल्ह्याला माई रमाई च्या नावाची मागणी
रत्नागिरी जिल्ह्याला माई रमाई च्या नावाची मागणी
On
मुंबई / रमेश औताडे
राज्य शासनाने औरंगाबाद, उस्मानाबाद, अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर केले. त्याच धर्तीवर आता त्यागमुर्तीं माई रमाई आंबेडकर यांचे नाव रत्नागिरी जिल्ह्याला देऊन त्यांचा शासनाने सन्मान करावा अशी मागणी आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा चे नेते रामभाऊ वाहणे यांनी केली आहे.
प्रमुख वक्ते नामदेवराव निकोसे यांनी माई रमाई ची जिवन गाथा सांगितली तेव्हा श्रोत्यांना अश्रू अनावर झाले होते. रत्नागिरी जिल्ह्याला माई रमाई चे नाव देण्यात यावे या करिता लवकरच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिष्टमंडळ भेटून निवेदन सादर करण्यात येईल असे आंबेडकरी विचार मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी सांगितले. शहराध्यक्ष प्रा.रमेश दुपारे, मनोहर इंगोले,सुरज ढोणे, पुण्यशील बोदले, चरणदास गायकवाड, अभिषेक मिश्रा, राहूल त्रिवेदी, भागनबाई मेश्राम, महानंदा इलमकर, संगिता वासनिक, रोहीत पांडे, शालिक बांगर, मामासाहेब मेश्राम, राजु पांजरे यावेळी उपस्थित होते.
000
Tags:
About The Author
Latest News
28 May 2025 15:19:39
पुणे : प्रतिनिधी
एरंडवणे येथील भीमनगर झोपडपट्टीचे एसआरए अंतर्गत पुनर्वसन योजनेत झोपडपट्टी धारकांची कोणतीही फसवणूक होऊ देऊ नका, गरज पडल्यास...