कराड नगरपालिकेच्या प्रभाग रचना प्रक्रियेस प्रारंभ

कराड नगरपालिकेच्या प्रभाग रचना प्रक्रियेस प्रारंभ

१५ जुलैपूर्वी काम पूर्ण करण्याच्या सूचना; अधिकाऱ्यांच्या बैठकांचे सत्र सुरु - मुख्याधिकारी व्हटकर

कराड : राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या अनुषंगाने प्रभाग रचनेसंदर्भात सूचना जाहीर झाल्या आहे. त्यानुसार दि. ११ जून ते १ सप्टेंबर या कालावधीत प्रभाग रचना प्रसिद्ध करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यादृष्टीने कराड नगरपालिकेचे प्रगणक गटाची मांडणी करण्याच्या दृष्टीने, तसेच प्रभाग रचना तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहिती मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांनी दिली.

गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित पडलेल्या नगरपालिका निवडणुकांचा बिगुल वाजला असून त्यादृष्टीने प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यादृष्टीने दि. ११ जून ते १६ जून पर्यंत प्रगणक गटाची मांडणी करणे, प्रभाग रचना तयार करणे, दि. १७ ते १८ जनगणनेची माहिती तपासणे, स्थळ पाहणी, गुगलमॅपवर प्रभागाचे नकाशे तयार करणे, प्रभागहद्दी जागेवर जावून तपासणे, प्रारूप प्रभाग रचनेच्या मसुद्यावर समितीने स्वाक्षऱ्या करणे आदी कामे दि. ८ जुलै पर्यत करण्याच्या सूचना आहेत.

तसेच निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याने प्रारूप प्रभाग रचनेस मान्यता देणे, प्रभाग रचना प्रसिद्ध करून त्यावर हरकती व सूचना मागविणे, जिल्हाधिकारी यांचेकडे हरकतींवर सुनावणी त्यानंतर प्राप्त हरकतींच्या शिफारशी विचारात घवून प्राधिकृत अधिकाऱ्यांनी अंतिम केलेली प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोग्यास मान्यतेसाठी पाठवणे, मान्यता दिलेली प्रभाग रचना संबंधित मुख्याधिकाऱ्यांस पाठविणे व त्यानंतर दि. १ सप्टेंबर रोजी अंतिम प्रभाग रचना प्रसिध्द करणे असे प्रभागरचनेचे वेळापत्रक देण्यात आलेले आहे. त्यानुसार नगरपालिकेमध्ये बैठक घेवून सूचना देण्यात आल्या आहेत.

हे पण वाचा  बांधकाम मंत्र्यांच्या उपस्थितीत मेढा शाळेत होणार शाळा 'प्रवेशोत्सव'

प्रारूप प्रभाग रचनेचे काम दि. १५ जुलै पूर्वी पूर्ण करायचे असल्याने नगरपालिकेत प्रभाग रचना करण्याच्या दृष्टीने अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या जात असल्याचे मुख्याधिकारी श्री. व्हटकर यांनी सांगितले.

000000000000000000000

Tags:

Advertisement

Latest News

यशवंत विचार संपूर्ण जिल्ह्यात पोहोचवणार यशवंत विचार संपूर्ण जिल्ह्यात पोहोचवणार
रणजीतसिंह देशमुख यांनी स्वीकारला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाचा पदभार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची उपस्थिती सातारा : सातारा जिल्ह्याने लोककल्याणकारी सुसंस्कृत...
पुणे ते सातारा रस्त्यांच्या विकसनाचा पुन्हा डीपीआर बनणार
शिवसेना महिला आघाडीच्या खटाव तालुका प्रमुखपदी मुमताज मुलाणी
मावळातील शाळेची जिल्हास्तरीय यशस्वी कामगिरी – पिंपळखुटे शाळेला तृतीय क्रमांकाचा सन्मान
मुसांडवाडी फाटा ते म्हासुर्णे रस्ता गेलाय पूर्ण पणे खड्ड्यात
पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वामुळे भारत चौथ्या क्रमांकाची महासत्ता
अहमदाबाद विमान दुर्घटनेत कराडची कन्या गमावली

Advt