कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर येथे मेथीचे बाजारभाव कडाडले. मेथी जुडी ६० रुपये दराने खरेदी!

कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर येथे मेथीचे बाजारभाव कडाडले. मेथी जुडी ६० रुपये दराने खरेदी!

मंचर, संतोष वळसे पाटील

कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर येथे मेथीचे बाजारभाव गुरुवार दि.१२ रोजी रात्री कडाडले. प्रति शेकडा ६००१ रुपये,प्रति जुडी ६० रुपये दराने मेथी जुडीची उच्चाकी भांवाने खरेदी व्यापाऱ्यांनी केल्याची माहिती बाजार समितीचे सभापती निलेश थोरात यांनी दिली.                                                   

कृषी उत्पन्न बाजार समिती येथे गुरुवारी रात्री भाजीपाला लिलावच्या वेळेस आराध्या व्हेजिटेबल  कंपनी व गुरुकृपा व्हेजिटेबल कंपनी राजूशेठ वाबळे व प्रशांत सैद यांच्या आडत गाळ्यावर खंडू गोपाळा भालेराव कळंब या शेतकऱ्याच्या मेथीला सर्वाधिक उच्चाकी बोली खरेदीदार रमेशशेठ थिगळे यांनी लिलावात बोली बोलून बाजारभाव ६० रुपये दराने प्रति जुडी खरेदी केली. मंचर बाजार समिती येथे चार तालुक्यांमधील शेतीमाल विक्रीसाठी येत असतो, गांजाळे व्हेजिटेबल कंपनी या आडत गाळ्यावर दिलीप तुकाराम डोके या शेतकऱ्याच्या कोथिंबिरीला प्रति जुडी २१ रुपये व तुषार पवळे या शेतकऱ्याच्या शेपू प्रतिजुडी २५ रुपये असा बाजार भाव मिळाला, भाजीपाला लिलावामध्ये खरेदीदार राजेश आवटे, चंदू सांडभोर, संपत बेनके,संपत थिगळे, उत्तम होले आदी खरेदीदाराने लिलावात भाग घेऊन शेतकऱ्यांचा माल खरेदी केला.शेतकऱ्यांनी आपला भाजीपाला मंचर बाजार समिती येथे विक्रीसाठी आणावा. असे आवाहन बाजार समितीचे उपसभापती सचिन पानसरे यांनी केले.

000

हे पण वाचा  Ahmedabad Aircrash | अहमदाबाद अपघाताचा पुण्यात परिणाम; दोन विमान रखडले!

Tags:

About The Author

Advertisement

Latest News

Advt