कराडमध्ये "कारगिल विजय कलशाचे" पूजन व मानवंदना

कराडमध्ये

विजय दिवस समारोह समितीच्या वतीने २६ व्या विजय कलश मोहिमेचे स्वागत

कराड : दिल्ली येथील सिटीझन्स सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने, कारगिल युद्धातील २६ व्या विजय कलश मोहिमेचे विजय दिवस समारोह समितीच्या वतीने कराड रेल्वे स्टेशनवर भव्य स्वागत करुन, कलशाचे पूजन केले. तसेच कराडकरांच्या वतीने विजय दिवस समारोह समितीचे सहसचिव सुभेदार विलासराव जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत मानवंदना देण्यात आली.

याप्रसंगी २६ व्या विजय कलश मोहिमेचे नेतृत्व करणारे मेजर जनरल पूरोहित, ब्रिगेडियर रवी मुनिस्वामी, कर्नल पी. व्ही. हरी व त्यांच्या टीमचे स्मृती चिन्ह, योद्धा सह्याद्रीचा कर्नल संभाजी पाटील गौरव ग्रंथ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला.

कारगिल विजय कलश यात्रा नवी दिल्ली येथून सुरू झाली असून देशभर प्रवास करुन २६ जुलै रोजी कारगिल द्रास सेक्टर येथे होणाऱ्या भव्य विजयोत्सव समारंभात संपणार आहे.

हे पण वाचा  सातारा जिल्ह्यातील दिंडीच्या सन्मानासाठी मठाधिपती विठ्ठल स्वामीं आक्रमक

कराड रेल्वे स्टेशनवर कलश यात्रेचे आगमनावेळी मोठ्या संख्येने मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या स्वागत, कलश पूजन व सत्कारप्रसंगी विजय दिवस समारोह समितीचे पदाधिकारी, वृक्षमित्र चंद्रकांत जाधव, उद्योगपती सलीम मुजावर, स्टेशन मास्तर अनिल शिंदे, राजीव अपिने, प्रा. जालिंदर काशीद, प्राचार्य गणपतराव कणसे, आत्माराम अर्जुगडे, प्रसाद पावसकर, अभियंता ए. आर पवार, विजय खबाले, छत्रपती शिवाजी उद्यान ग्रुप व एनव्हायर क्लबचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कराड रेल्वे स्टेशनचे प्रमुख अनिल शिंदे यांनी रेल्वेची पाच मिनिटे वेळ वाढवून घेतल्यामुळे, रेल्वे स्टेशनवर कारगिल विजय कलशाचे भव्य स्वागत, कलशाचे पूजन करून हुतात्म्यांना पुष्पांजली वाहण्याचा समारंभ संपन्न झाला.

0000000000000000

Tags:

Advertisement

Latest News

मावळ तालुक्यातील कुंडमळा दुर्घटनास्थळाची उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली पाहणी मावळ तालुक्यातील कुंडमळा दुर्घटनास्थळाची उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली पाहणी
वडगाव मावळ/ प्रतिनिधी  मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील साकव पुल कोसळून झालेल्या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला, तर ५१...
सिडने पॉईंटवरील पालिकेचा सोलर ट्री कोसळला
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोरेगावात आरोग्य विभागातर्फे हिवताप आणि डेंग्यूबाबत जनजागृती
कोरेगावातील शिरढोण मागासवर्गीयांच्या शौचालयावर डल्ला..
धोम वाई खून खटला जलद गतीने चालवावा न्यायालयाचे निर्देश
जावली तालुक्यातील अवैध दारूविक्रीच्या विरोधात लवकरच आंदोलनं
सात्विक सावंत याचे नीट युजी परीक्षेत उज्जवल यश

Advt