Ujani Dam News | उजनी धरण क्षेत्रात मुसळधार पाऊसाची हजेरी
दौडमधून १८ क्युसेस विसर्गाने पाण्याची आवक सुरू, २४ तासात पाच टीएमसी पाणी वाढले
टेंभुर्णी, प्रतिनिधी
उजनी धरण परिसरात काही दिवसांपासून पावसाने हजेरी लावली असून दि.२२ तारखेपासून उजनीच्या पाणीसाठ्यात वाढ होत असताना रविवारी दिवसभर पुणे जिल्ह्यातील उजनीच्या लोकल एरीयात ढगफुटीसदृष्य अवकाळी पाऊस बरसला असून रविवारी सकाळी सहा ते सोमवारी सकाळी सहा या चोवीस तासात उजनीत दौंडमधून १८ हजार क्युसेस विसर्गाने पाणी जमा होण्यास सुरुवात होऊन पाणीसाठ्यात ५ टीएमसी ने वाढ होत एकुण ५९.५२ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.तर चार दिवसांत ८ टीएमसी ने पाणीसाठा वाढला आहे.येत्या दोन दिवसांत उजनी मायनसमधून प्लसमध्ये येण्याची आशा आहे.
शनिवार दि.२४ पासून उजनी धरण परिसरातील दौंड भिगवण,पळसदेव,पाटस,कुरकुंभ यवत,रावणगाव, या परिसरात रविवारी चोवीस तासांत अंदाजे दीडशे ते दोनशे मीलीमीटर पाऊस पडला असून संततधार चालूच असल्याने ओढे,नाले तलाव भरभरून वाहू लागले आसल्यने उजनीत सर्व ठिकाणाहून पाणी जमा होत असून १३ तासात जवळपास ५ टीएमसी ने पाणी वाढले आहे तर दि २१ रोजी ५१.३६ टीएमसी पाणीसाठा होता त्यांमध्ये सोमवारी सकाळी वाढ होऊन ५९.५२ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.रविवारी रात्री दौंडचा विसर्ग १० हजार क्युसेस होता व इतर ठिकाणावरून जमा होणारे पाणी मिसळून रात्रीत १८ हजार क्युसेस होऊन जवळपास दोन ते तीन टीएमसी पाणी वाढले आहे.तसेच निरा व भीमा नदीच्या खो-यात जोरदार पाऊस बरसत असून निरा नदीतून लाटे येथे २६५२५ क्युसेक्स ने नदीपात्रात सुरू असून भीमा व नीरा नदिकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा दिला आहे.
उजनी पाणी पातळी
उजनी दि.२६ रोजी सकाळी ६ वाजता
एकूण पाणीसाठा -५९.५२टीएमसी
उपयुक्त पाणीसाठा - वजा ७.६८ टीएमसी
टक्केवारी - वजा ७.७८टक्के
येणारा विसर्ग
दौंड १८५०६ क्युसेस
000