विजयादशमीपासून संघ साजरे करणार शताब्दी वर्ष
देशभरात वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन
नागपूर: प्रतिनिधी
या विजयादशमीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शंभराव्या वर्षात पदार्पण करीत आहे. या विजयादशमीपासून पुढील वर्षाच्या विजयादशमीपर्यंत संघ विविध देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून शताब्दी वर्ष साजरे करणार आहे, अशी माहिती संघाचे प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावर्षी संघाच्या विजयादशमी कार्यक्रमाला माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे प्रमुख पाहुणे असणार आहेत. यावेळी सरसंग चालक मोहन भागवत विशेष मार्गदर्शन करणार आहेत. विख्या गायक शंकर महादेवन या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असून ते संघाच्या पद्य आणि गीतांचे गायन करणार आहेत. कार्यक्रमात बजाज समूहाचे संजीव बजाज यांच्यासह घाना, इंडोनेशिया, थायलंड आणि अमेरिकेसह विविध देशांमधील नागरिक उपस्थित राहणार आहेत..
या विजयादशमीला नागपुरातून तीन ठिकाणाहून संचलन होणार असून ती व्हरायटी चौकात एकत्र येतील. या ठिकाणी सरसंघचालक उपस्थितांना संबोधित करते त्यानंतर योग आणि इतर प्रात्यक्षिके सादर केली जाणार आहेत.
शताब्दी वर्षात संघाच्यावतीने घरोघर जाऊन संपर्क अभियान राबवले जाणार आहे. देशभरात ठिकठिकाणी हिंदू संमेलने, युवक संमेलने, संपर्क कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. त्याचप्रमाणे कोलकाया, बंगळुरू आणि मुंबईमध्ये सरसंघचालक संपर्क अभियान घेणार आहेत.
देशभरात 83 हजार दैनंदिन शाखा आणि 32000 पेक्षा साप्ताहिक संमेलने संघाच्या माध्यमातून केली जात आहे. सर्व समाजाला एका दृष्टने बघणे, सामाजिक समरसता आणि स्वावलंबन या बाबींवर संघाचा भर आहे. शंभर वर्ष संघ व्यक्ती निर्माणाचे काम करत आहे. केवळ १७ जणांपासून सुरू झालेल्या संघाची कोट्यवधी स्वयंसेवक ही खरी फलश्रुति आहे असे आंबेकर म्हणाले.