माणुसकी जोपासणारे व्यक्तिमत्व - अभियंता सतीश चिखलीकर
पुणे / रमेश जाधव
महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजना विभागात कार्यरत असणारे अभियंता सतीश चिखलीकर हे महाराष्ट्राच्या प्रशासकीय, सामाजिक, राजकीय क्षेत्राला परिचित असणारे व्यक्तिमत्व ! प्रशासनात राहूनही त्यांचा जनसंपर्क विविध समूहाची आणि त्या क्षेत्रातील मान्यवरांशी जवळून राहिला आहे. त्यांचे नाव अभियंता क्षेत्रात अत्यंत आदराने आणि सन्मानाने घेतले जाते. नुकतीच सतीश चिखलीकर यांना महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या सचिव या सर्वोच्च पदावर पदोन्नती मिळाली आहे. त्यांच्या पदोन्नतीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे .
अभियंता सतीश चिखलीकर हे नाव महाराष्ट्राच्या बांधकाम विभागाला वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना परिचित आहे . आज महाराष्ट्रासमोर चिखलीकर यांचे व्यक्तिमत्त्व आदराचे आहे . तो आदर आणि सन्मान मिळवण्यासाठी त्यांनी आपल्या जीवनात केलेला संघर्ष, घेतलेले कष्ट ,कामाप्रती बाळगलेली निष्ठा हे अनेकांना जीवन जगण्यासाठी धडे देणारी आहे .त्यांचे लहान पासून आजतागायतचे जीवन हे प्रेरणादायी असून सर्व स्तरातील अधिकारी वर्गाला भविष्यातही ते प्रेरणास्रोत ठरावे असेच आहे .
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून 1993 साली श्रेणी वर्ग - १ मध्ये उत्तीर्ण झालेल्या अभियंता सतीश चिखलीकर यांचे अभियांत्रिकी शिक्षण औरंगाबाद येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात पूर्ण झाले .त्यानंतर त्यांनी सांगलीच्या वालचंद येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात एमई (स्ट्रक्चर)ही सर्वोच्च पदवी संपादन केली . तत्पूर्वी त्यांनी नांदेड येथेही अभियांत्रिकीचा डिप्लोमा पूर्ण केला. सन 1995 मध्ये अभियंता चिखलीकर यांचे शासकीय सेवेत पदार्पण झाले .
दरम्यानच्या कालखंडात त्यांनी लातूर, नाशिक, पुणे, नगर आदी ठिकाणी शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येणारे अनेक महत्त्वकांशी प्रकल्प मार्गी लावले . आव्हानात्मक कामे अत्यंत सक्षमपणे आणि धाडसाने कोणत्याही अडचणींचा पाढा न वाचता पूर्णत्वास नेली . आपल्यातील क्षमता सिद्ध करून चिखलीकर यांनी शासकीय सेवेचे सोने केले . गेल्या 29 वर्षात एक बुद्धिमान अभियंता असल्याची चुणूक त्यांनी कामाच्या माध्यमातून दाखवून दिली . आव्हाने स्वीकारण्याची सवय असलेल्या अभियंता चिखलीकर यांनी आपल्या स्वभावानुसार सार्वजनिक बांधकाम विभागात आलेली आव्हाने सहजपणे पार करून इतरांनाही आपल्या बौद्धिक क्षमतांची ताकद दाखवून दिली आहे .
यशाने हुरळुन न जाता जमिनीवर राहून आकाशाला गवसणी घालणारे स्वप्न बघण्याची उमेद आणि त्या स्वप्नांना पंख देण्याची , पंखांना बळ देण्याची क्षमता अभियंता सतीश चिखलीकर यांच्यात असल्यामुळेच त्यांच्याविषयी मित्रपरिवाराला नेहमीच आदर वाटतो .चिखलीकर नेहमीच सर्वसामान्य व्यक्तीपासून साहित्यिक , विचारवंतांपर्यंत परिचित राहिले आहेत .अवघड कामगिरी त्यांनी सहजपणे पेलल्यामुळे शासनाने चिखलीकर यांना प्रतिष्ठेच्या पदावर बसवुन त्यांच्या शक्तीचा , ज्ञानाचा , प्रतिभेचा , विचारांचा आणि श्रमाचा समाजाच्या हितासाठी उपयोग करून घेतल्याचे दिसून येते . स्वतःला आणि सहकाऱ्यांना शासनाच्या विरुद्ध नव्हे तर शासनासाठी काम करायला लावणे आणि त्यातून शासनाच्या आणि समाजाचे हित साध्य करणे हे त्यांचे वैशिष्ट्य सहजपणे लक्षात येते . सकारात्मक विचारांनी घडलेले हे बहुआयामी व्यक्तिमत्व नेहमीच आपले वेगळेपण सिद्ध करत आले आहेत . नेहमी मोक्याच्या जागी विराजमान होता आले नसले तरी आज सचिव या सर्वोच्च पदावर ते विराजमान झाल्याचा सार्थ अभिमान वाटल्या वाचून राहत नाही .
मैत्री म्हणजे सुखाचा गुणाकार आणि दुःखाचा भागाकार हा स्पॅनिश विचार आहे .मैत्री आणि बंधुभाव हा तथागतांचा उपदेश आहे .अभियंता सतीश चिखलीकर हे मैत्री भावनेचा गुणाकार करणार व्यक्तिमत्व असल्याची जाणीव होते . मैत्रीने ते स्वतः तर सुखावतातच पण त्यांच्या सानिध्यात येणाराही शितल सुखाचा अनुभव घेऊन तोही सुखावतो . त्या मैत्रीत प्रेमाचा पाझर असतो . माणुसकीचे दुसरे नाव अभियंता चिखलीकर असल्याचा अनुभव आल्यावाचुन रहात नाही . प्राणीमात्रावर हृदयपूर्वक प्रेम करणे हीच खरी मानवत आहे .अभियंता सतीश चिखलीकर यांनी आपल्या आयुष्यात हा विचार कायमच रुजवलेला दिसून येतो .
खरे तर शासनाचा सर्वोच्च सचिव पदाचा पदभार स्वीकारलेल्या अभियंता चिखलीकर यांचा जीवन प्रवास जीवनाच्या सर्व आघाड्यांवर यशस्वी होण्यासाठी झगडणाऱ्यांना आदर्शवत असाच आहे . शासनाच्या अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांवर काम करत असताना कामाप्रती निष्ठा बाळगून आपणाला दिलेल्या जबाबदारीला पूर्णत्वाकडे घेऊन जाण्याची त्यांची असलेली सचोटी ही वाखाणण्याजोगी आहे .परिपूर्ण स्वातंत्र्याने आणि सर्वाधिक आनंदाने जीवन जगणारे अभियंता सतीश चिखलीकर बांधकाम विभागाची बौद्धिक संपदा म्हणून कार्यरत असल्याची खात्री पटल्यावाचून राहत नाही .
000
Comment List