चीनमध्ये पुन्हा एका रोगाचे थैमान
कोरोना काळाची पुनरावृत्ती होण्याची भीती
बीजिंग: वृत्तसंस्था
कोरोना महामारीच्या दहशतीचे सावट दूर झाले असले तरीही चीनमध्ये आणखी एका रोगाने थैमान घातले असून देशभरातील रुग्णालय रुग्णांनी भरून गेली आहेत. इन्फ्लुएंजा ए, मायकॉप्लाज्मा न्यूमोनिया आणि ह्यूमन मेटापनेयूमोवायरस असे या विकाराचे नाव आहे. तापाचा हा प्रकार फैलावण्यामागे खरोखरच नैसर्गिक कारणे आहेत की चीनचा हलगर्जीपणा आहे, याविषयी चर्चा झडू लागल्या आहेत.
सध्या चीनमध्ये इन्फ्लुएंजा ए, मायकॉप्लाज्मा न्यूमोनिया आणि ह्यूमन मेटापनेयूमोवायरस नावाच्या तापाच्या एका प्रकाराने थैमान घातले आहे. कोरोनाप्रमाणेच हा देखील श्वसनाचा विकार असून सर्दी, खोकला, ताप, श्वास घेण्यास त्रास अशीच याची लक्षणे आहेत. हा देखील कोरोनाप्रमाणे वेगाने फैलावणारा साथीचा रोग आहे. त्यामुळे चीनमधील लोकांच्या कोरोनाच्या आठवणी जाग्या झाल्या असून त्यांचा थरकाप होत आहे.
विशेषतः लहान मुले आणि वृद्ध लोक या इन्फ्लुएंजा ए, मायकॉप्लाज्मा न्यूमोनिया आणि ह्यूमन मेटापनेयूमोवायरस विकाराला बळी पडत आहेत. या विकाराच्या रुग्णांमुळे रुग्णालय भरून गेली आहेत. हा रोग याच वेगाने फैलावत राहिला, तर पुन्हा लॉकडाऊन ची वेळ येते काय, अशी भीती चिनी नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.
000
Comment List