- देश-विदेश
- शिवसेना शिंदे गटाच्या खासदारांची राजधानीत बैठक
शिवसेना शिंदे गटाच्या खासदारांची राजधानीत बैठक
उपराष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचे आयोजन
मुंबई: प्रतिनिधी
उपराष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाची बैठक राजधानीत होत असून खासदार शिंदे या बैठकीचे नेतृत्व करत आहेत. शिवसेना शिंदे गटाची सर्व मते राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना मिळतील, असा विश्वास या बैठकीत व्यक्त करण्यात आला आहे.
माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणामुळे राजीनामा दिल्यानंतर 9 सप्टेंबर रोजी उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत विरोधकांनी निवृत्त न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी दिली आहे.
या निवडणुकीची रणनीती निश्चित करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली असून त्यासाठी काल रात्रीच पक्षाचे सर्व खासदार दिल्लीत दाखल झाले आहेत. शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वीच राधाकृष्णन यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
शिवसेना शिंदे गटाच्या खासदारांची अंतर्गत एकजूट आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांमधील एकी व्यक्त करण्याच्या दृष्टीने या बैठकीला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.