सचिन यांच्या उपस्थितीत 'मुक्काम पोस्ट देवाचं घर'चा ट्रेलर लॉन्च संपन्न

31 जानेवारीला चित्रपट होणार राज्यभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित

सचिन यांच्या उपस्थितीत 'मुक्काम पोस्ट देवाचं घर'चा ट्रेलर लॉन्च संपन्न

पुणे: प्रतिनिधी

आपण पाठवलेलं पत्र अमेरिकेला पोहोचतं, तर देवाच्या घरी नक्की पोहोचेल असं वाटणाऱ्या एका लहान निरागस मुलीचा देवाच्या घराचा शोध "मुक्काम पोस्ट देवाचं घर" या चित्रपटातून उलगडणार आहे. हृदयस्पर्शी आणि मनोरंजक कथानक असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर लाँच नुकताच सुप्रसिद्ध अभिनेते, निर्माते दिग्दर्शक सचिन पिळगांवकर यांच्या मुख्य उपस्थितीत संपन्न झाला. याप्रसंगी चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार आवर्जून उपस्थित होते. येत्या ३१ जानेवारीला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

लहान मुलांच्या भावविश्वात खूप काही सुरू असतं. मुलांना अनेक प्रश्न पडत असतात. त्या प्रश्नांची उत्तरं मुलं आपल्या पद्धतीनं शोधण्याचा प्रयत्न करतात. "मुक्काम पोस्ट देवाचं घर" या चित्रपटात ग्रामीण भागातली गोष्ट मांडण्यात आली आहे. सैन्यात असलेले वडील देवाघरी गेले असं आईनं मुलीला सांगितल्यावर देवाचं म्हणजे काय ? आणि ते कुठे असतं? याचा शोध सुरू होतो. त्याबरोबरच तिची आई आपल्या शहीद झालेल्या पतीचं पेन्शन मिळवण्यासाठी संघर्ष करत असल्याचं ट्रेलरमधून दिसतं. त्यामुळे भावनिकतेची किनार असलेल्या या कथानकाची मांडणी अतिशय हलक्याफुलक्या, रंजक पद्धतीनं केल्याचं ट्रेलरमधून समजतं आहे. श्रवणीय संगीताचीही जोड या कथानकाला असून "सुंदर परिवानी" ह्या गोड़ गीताला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली आहे. 

एखादी चांगली कलाकृती तुम्ही केल्यावर नक्कीच त्यामागे अनेकजण पाठीशी खंबीरपणे उभे राहतात त्याचप्रमाणेच मंगेश ही या कलाकृतीच्या मागे प्रस्तुतकर्ता म्हणून उभा राहिला.चित्रपटाचा ट्रेलर मला खुप आवडला. दिग्दर्शक संकेतने या चित्रपटाची मांडणी उत्तम केली असल्याचे ट्रेलर मधून दिसून येते आहे. मायराने या चित्रपटात साकारलेली प्रमुख भूमिका उल्लेखनीय असल्याचे ट्रेलर मधून जाणवते आहे. तिने यात सातत्य ठेऊन अनेक उत्तम भूमिका साकारुन मनोरंजन विश्वात अजुन नाव कामवावे यासाठी माझे तिला अनेक आशीर्वाद असल्याचे सचिन पिळगांवकर यांनी सांगितले.  

मनीष कुमार जायसवाल आणि मंगेश देसाई यांनी 'मुक्काम पोस्ट देवाचं घर' या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. कीमाया प्रॉडक्शनचे महेश कुमार जायसवाल, किर्ती जायसवाल हे  या चित्रपटाचे निर्माते असून त्यांची ही पहिलीच निर्मिति आहे तर वैशाली संजू राठोड, सचिन नारकर, विकास पवार हे सहनिर्माते आहेत. चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन संकेत माने यांचे असून संकेत माने, सुमित गिरी यांनी पटकथालेखन, सुमित गिरी यांनी संवादलेखन केले आहे. या चित्रपटात मायरा वायकूळ, मंगेश देसाई, कल्याणी मुळे, प्रथमेश परब, रेशम श्रीवर्धन, सविता मालपेकर, उषा नाडकर्णी, माधवी जुवेकर, कमलेश सावंत, स्पृहा परब, रुक्मिणी सुतार  यांच्या मध्यवर्ती भूमिका  चित्रपटात पहायला मिळणार असून अभिनेत्री पूजा सावंत ही पाहूण्या कलाकारच्या भूमिकेतून आपल्या भेटीस येणार आहे.चित्रपटाचे छायाचित्रण रोहन मडकईकर यांनी केले असून गीतकार मंगेश कांगणे यांनी लिहिलेल्या गीताना चिनार महेश यांचे श्रवणीय संगीत लाभले आहे. पार्श्वसंगीत आदित्य बेडेकर याचे असून कार्यकारी निर्माता म्हणून अतुल साळवे यांनी काम पाहिले आहे.   

तर असा हा सहकुटुंब पाहता येणारा चित्रपट येत्या ३१ जानेवारीला चित्रपटगृहात जाऊन नक्कीच पाहावा लागेल यात शंका नाही.

*Trailer Link*

https://youtu.be/-2UKXAkxyiY?si=999wM64zQxn4tb_z

 

 

Share this article

About The Author

Post Comment

Comment List

Follow us

Latest News

धारदार शस्त्राने वार करुन तरुणाची निर्घृण हत्या, तळेगाव दाभाडे येथील धक्कादायक घटना
वडगाव मावळची भूमी भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचे प्रतीक
'... म्हणून केली बाबा सिद्दिकी यांची हत्या,
Amritsar News | अमृतसर मधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा विटंबनेचा तीव्र निषेध - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले 
आमदार सुनील शेळके यांचा वडगाव शहरात जनसंवाद यात्रेनिमित्त नागरिकांशी संवाद
तळागाळातील माध्यमांचा उत्सव: साधना हायपर-लोकल जर्नलिझम पुरस्कारांचे उद्घाटन!
मिशन मोडवर काम करून तालुक्यातील पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करा
प्रियंका इंगळेच्या नेतृत्वात भारताने जिंकला खो-खो विश्वचषक
... तर देशात अराजकाची भीती
तळेगाव- एमआयडीसी पोलीस ठाण्यात बालस्नेही पोलीस कक्ष सुरू