"कुर्ला टू वेंगुर्ला"  चित्रपटाचा दमदार ट्रेलर  लाँच

ग्रामीण भागातील मुलांच्या रखडणाऱ्या लग्नाचा संवेदनशील विषयाची रंजक मांडणी

विजय कलमकर दिग्दर्शित चित्रपट १९ सप्टेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित

"कुर्ला टू वेंगुर्ला" या चित्रपटातून प्रेक्षकांना सहकुटुंब पुरेपूर मनोरंजन अनुभवता येणार आहे. गावातील तरुणांच्या न होणाऱ्या लग्नाचा विषय हलक्याफुलक्या पद्धतीने मांडण्यात आला असून, उत्तमोत्तम कलाकार असलेल्या या चित्रपटात मालवणी बोलीचाही तडका आहे. विजय कलमकर दिग्दर्शित या चित्रपटाची चित्रपटसृष्टीत चर्चा असून,  १९ सप्टेंबर रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. 

सध्या राज्यभरातील ग्रामीण भागात मुलांची लग्न जमणे ही समस्या झाली आहे. गावातल्या मुलींना शहराचे आकर्षण असते, त्यांच्याही आयुष्याबद्दल काही इच्छा-आकांक्षा असतात. परिणामी शहर आणि ग्रामीण भाग अशी एक दरी निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील मुलांच्या रखडणाऱ्या लग्नाचा संवेदनशील विषय, त्याच्याशी जोडलेले सामाजिक मुद्दे, परस्पर नातेसंबंध अशा विषयाची मांडणी कुर्ला टू वेंगुर्ला या चित्रपटात करण्यात आली आहे. गंभीर विषयाची अत्यंत मनोरंजक पद्धतीने हाताळणी या चित्रपटात करण्यात आली आहे. त्यामुळे सहकुटुंब चित्रपटगृहात अनुभवावा असा हा चित्रपट आहे. आतापर्यंत टीजर, ट्रेलरने चित्रपटाविषयी उत्सुकता वाढवली आहे. 

सिने कथा कीर्तन, चंद्रभागा स्टुडिओज आणि एम व्ही शरतचंद्र  यांनी "कुर्ला टू वेंगुर्ला" या चित्रपटाची निर्मिती केली आहे. अमरजीत आमले, विजय कलमकर, चारुदत्त सोमण, नयना सोनावणे, अविनाश सोनावणे, एम. व्ही. शरतचंद्र हे या  चित्रपटाचे निर्माते आहेत. चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद लेखन अमरजीत आमले यांनी, तर दिग्दर्शन विजय कलमकर यांनी केलं आहे. अभिनेते वीणा जामकर, प्रल्हाद कुडतरकर, वैभव मांगले, सुनील तावडे, स्वानंदी टिकेकर, साईंकित कामत अशी उत्तम स्टारकास्ट या चित्रपटात आहे. यासोबतच अमेय परब,  शेखर बेटकर आणि अनघा राणे या नवोदित कलाकारांचा अभिनयही आपल्याला पाहायला मिळणार आहे. रंगनाथ बाबू गोगीनेनी यांनी छायांकन, विजय कलमकर यांनी संकलन, अविनाश सोनावणे यांनी ध्वनिआरेखन, चंचल काळे, अमरजित आमले यांनी गीतलेखन,  अक्षय खोत यांनी संगीत दिग्दर्शन, पार्श्वसंगीताची जबाबदारी निभावली आहे, तर वितरक म्हणून पिकल  एंटरटेनमेंट काम पाहणार आहे.

हे पण वाचा  हैदराबाद गॅझेटियरच्या शासन निर्णयाला न्यायालयात आव्हान

माती आणि नाती जोडणारा, प्रत्येक कुटुंबाची गोष्ट सांगणारा कुर्ला टू  वेंगुर्ला हा चित्रपट मोठ्या पडद्यावर १९ सप्टेंबरपासून पाहता येणार आहे.

*Trailer Link*

https://youtu.be/MC-eiBfOA4E?si=2JXRRk7zynGVqyKF

About The Author

Advertisement

Latest News

आरक्षणासाठी पदवीधर बंजारा तरुणानेही घेतला गळफास आरक्षणासाठी पदवीधर बंजारा तरुणानेही घेतला गळफास
धाराशिव: प्रतिनिधी  हैदराबाद गॅझेटियरनुसार मराठा समाजाप्रमाणे बंजारा समाजालाही आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी असलेली चिठ्ठी लिहून राहत्या घरात गळफास लावून...
प्रकाश महाजन यांनी दिला मनसेच्या सर्व पदांचा राजीनामा
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज
'संजय राऊत यांच्या विरोधात कारवाई करा'
वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना मोठा दिलासा
मनोज राणे यांचा भाजपला राम राम
सीएफए इन्स्टिट्यूटतर्फे फायनान्स इंडस्ट्री नेटवर्क राउंडटेबलचे आयोजन

Advt