'सत्ताधारी पक्षात प्रवेशासाठी पोलिसांकडून दबाव'

शिवसेना ठाकरे गटाचे नेते वसंत गीते यांचा आरोप

'सत्ताधारी पक्षात प्रवेशासाठी पोलिसांकडून दबाव'

नाशिक: प्रतिनिधी

विरोधातील नेते आणि कार्यकर्ते आपल्याकडे खेचून घेण्यासाठी सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गटांकडून पोलीस दलाचा गैरवापर केला जात आहे. पोलिसांमार्फत दबाव आणून त्यांना पक्ष बदलण्यास भाग पाडले जात आहे, असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते वसंत गीते यांनी केला आहे. 

आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. पक्षाचे अनेक नेते आणि कार्यकर्ते शिवसेना शिंदे गट किंवा भारतीय जनता पक्षात प्रवेश करत आहेत. ठाकरे गटाचे माजी महानगर प्रमुख विलास शिंदे यांच्या जागी चार दिवसापूर्वीच मामा राजवाडे यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र, राजवाडे भाजपामध्ये जाणार असल्याची कुणकुण लागल्याने त्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले. 

ही सर्व पक्षांतरे पोलिसांच्या धाकाने करवून घेतली जात असल्याचा गीते यांचा आरोप आहे. खोटे गुन्हे दाखल करून आणि ब्लॅकमेलिंग करून विरोधकांना सत्ताधारी पक्षात येण्यास भाग पाडले जात आहे, असा त्यांचा दावा आहे. मात्र, खासदार नरेश म्हस्के यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे. पक्षप्रवेशासाठी आम्हाला पोलिसांची गरज नसल्याचा दावा त्यांनी केला. त्याचप्रमाणे या पुढील काळात ठाकरे गटात कोणीही शिल्लक राहणार नाही, असेही ते म्हणाले. 

हे पण वाचा  बा विठ्ठला… बळीराजाला सुखी व समाधानी ठेव, राज्यावरील संकटे दूर कर, सर्वांनाच सन्मार्गाने जगण्याची सुबुद्धी दे

 

Tags:

About The Author

Advertisement

Latest News

Advt