श्री विघ्नहर साखर कारखान्यावर सत्यशील शेरकर यांची निर्विवाद सत्ता

२१ पैकी १७ जागा बिनविरोध, इतर चार जागांवरही दणदणीत विजय

श्री विघ्नहर साखर कारखान्यावर सत्यशील शेरकर यांची निर्विवाद सत्ता

नारायणगाव: वार्ताहर

जुन्नर व आंबेगाव तालुका कार्यक्षेत्र असलेल्या शिरोली धालेवाडी येथील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत एकूण २१ जागांपैकी १७ जागा बिनविरोध निवडून आल्या, तर चार जागांवर झालेल्या निवडणुकीमध्ये विद्यमान चेअरमन सत्यशील शेरकर यांनी चारही जागांवर दणदणीत विजय मिळवला.

निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत अधिकारी गोविंद शिंदे यांनी याबाबत माहिती दिली.  इतर मागासवर्गीय गटातून सुरेश भीमाजी गडगे हे नऊ हजार पेक्षा जास्त मतांनी निवडून आले. त्यांचे प्रतिस्पर्धी नीलेश भुजबळ यांना फक्त २२१ तर रहमान इनामदार यांना केवळ ११६ मते मिळाली. ३६० मते बाद झाली असून सुरेश भीमाजी गडगे यांचा दणदणीत विजयी झाला.  

खुल्या गटासाठी सत्यशील शेरकर  यांना पडलेली मते १०,४२३, संतोषनाना खैरे १०,०२५ , सुधीर खोकराळे -  १०,.०५७  व अपक्ष  रहेमान इनामदार अवघी ३४९ मते मिळाली.  यानुसार विद्यमान चेअरमन सत्यशील शेरकर यांचा दणदणीत विजय झाला असून स्थापनेपासून कारखान्यावर असलेली शेरकर कुटुंबीयांचीच सत्ता अबाधित राखण्यात त्यांना यश मिळाले आहे.

हे पण वाचा  संभाजीनगर मध्ये संविधान गौरव सोहळ्याचे आयोजन

About The Author

Advertisement

Latest News

Advt