महिंद्रा लॉजिस्टिक्सने फलटण येथे कमिन्स इंडियासाठी सुरू केली वेअरहाऊसिंग सुविधा!

फेज 1 च्या सादरीकरणाचा भाग म्हणून 3 लाख चौरस फूटांहून अधिक वेअरहाऊसिंग स्पेस कार्यान्वित, ही सुविधा स्थानिक समुदायांसाठी 500 हून अधिक रोजगाराच्या संधी निर्माण करेल

महिंद्रा लॉजिस्टिक्सने फलटण येथे कमिन्स इंडियासाठी सुरू केली वेअरहाऊसिंग सुविधा!

पुणे, फलटण : भारतातील सर्वात मोठ्या एकात्मिक लॉजिस्टिक्स उपायसुविधा पुरवठादारांपैकी एक असलेल्या महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेडने आज महाराष्ट्रातील फलटण  येथे त्यांच्या नवीन अत्याधुनिक वेअरहाऊसिंग सुविधेचे उद्घाटन झाल्याचे जाहीर केले. त्यायोगे भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या औद्योगिक विभागांपैकी एका ठिकाणी त्यांनी आपले स्थान अधिक मजबूत केले आहे. या मोठ्या साईटमधील 3 लाख चौरस फूटांहून अधिक भाग आता कमिन्स इंडिया साठी समर्पित आहे. कमिन्स इंडिया ही भारतातील अग्रगण्य ऊर्जा सुविधा पुरवठादार आहे. या सुविधेमुळे कमिन्स इंडिया संपूर्ण भारतातील त्यांचे कामकाज अधिक प्रभावी बनवण्यासाठी विविध स्त्रोतांमधून येणाऱ्या उत्पादनांचे एका केंद्रीकृत ठिकाणी एकत्रीकरण करू शकतील. या वेअरहाऊसच्या माध्यमातून एका विस्तृत एकात्मिक वेअरहाऊसिंग व वितरण नेटवर्कद्वारे महिंद्रा लॉजिस्टिक्स कमिन्स इंडियाच्या लॉजिस्टिक म्हणजेच दळणवळण क्षमतेत वाढ करेल तसेच पुरवठा साखळीची कार्यक्षमता, उपलब्धता आणि दृश्यमानता वाढवेल.  

फलटण हे झपाट्याने विकास होत असलेले एक महत्त्वाचे लॉजिस्टिक्स आणि उत्पादन केंद्र बनत आहे आणि कमिन्स इंडियासाठी असलेले हे समग्र लॉजिस्टिक्स केंद्र पुण्याजवळ आणि महत्वाच्या महामार्गांशी आणि औद्योगिक पट्ट्यांशी थेट जोडलेले आहे. या सुविधेद्वारे महिंद्रा लॉजिस्टिक्स त्यांच्या ग्राहकांना एकात्मिक लॉजिस्टिक्स उपायसुविधा पुरवण्याची आणि संपूर्ण पुरवठा साखळी व्यवस्थापनाची बांधिलकी मजबूत करत आहे. यामध्ये साईट ओळख, हरितक्षेत्र विकास आणि एकत्रित उत्पादन व वितरण कार्यपद्धती यांचा समावेश आहे. या प्रदेशातील सर्वात प्रगत वेअरहाऊसिंग प्रकल्प म्हणून ही साईट कमिन्स इंडियाच्या इनबाउंड व आउटबाउंड लॉजिस्टिक्स ऑपरेशन्स, वेअरहाऊस व्यवस्थापन, अंतिम टप्प्याच्या वितरण व्यवस्थापनासोबतच उत्पादन कामकाजामध्येही सहाय्य करेल. कंपनीच्या सहज, कार्यक्षम व विस्तारीत उपायसुविधांमुळे ग्राहकांसाठीच्या कामकाज दृश्यमानता, सेवा पातळी आणि किंमत कार्यक्षमता यात वाढ होईल.

कमिन्स इंडियाच्या जागतिक शाश्वतता मानकांशी सुसंगत अशी ही महिंद्रा लॉजिस्टिक्सची वेअरहाऊस सुविधा अक्षय ऊर्जा वापरून कार्यान्वित केली जात आहे आणि सोलर पॅनेल्स व प्रगत जलशुद्धीकरण प्रणालींसारख्या टिकाऊ वैशिष्ट्यांचा यात समावेश आहे.

महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत सिक्का म्हणाले, “भारत जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून नावारूपाला येत असून यातून औद्योगिक नाविन्यपूर्णता, सहजसोपी पुरवठा साखळी आणि भविष्यकालीन पायाभूत सुविधांची शक्ती प्रतिबिंबित होते. आजच्या गतिशील अर्थव्यवस्थेच्या गरजांना प्रतिसाद देत या परिवर्तनाचे महत्त्वाचे आधारस्तंभ म्हणून लॉजिस्टिक्स हे बदलत असून अधिक स्मार्ट होत आहे. कमिन्स इंडियाला पोहोच, दृश्यमानता आणि कामकाज कार्यक्षमता पुरविण्यासाठी या गतीशी सुसंगतपणे फलटण मधील आमचे वेअरहाऊस आमच्या संपूर्ण देशव्यापी वेअरहाऊसिंग व वितरण नेटवर्कशी जोडलेले आहे. आम्ही लॉजिस्टिक्सकडे देशाच्या वाढीसाठीचे एक धोरणात्मक विकास इंजिन म्हणून बघतो. प्रगत तंत्रज्ञानाने सुसज्ज आणि स्केलेबल अशा भविष्यकालीन पायाभूत सुविधांचे जाळे उभारण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”

हे पण वाचा  डी डेव्हलपमेंट इंजिनीअर्स लिमिटेडतर्फे श्रुती अगरवाल यांची पूर्णवेळ संचालकपदावर पदोन्नती

000

Tags:

About The Author

Advertisement

Latest News

कास तलाव भरू लागला परिसरात सलग दोन दिवस मुसळधार पाऊस कास तलाव भरू लागला परिसरात सलग दोन दिवस मुसळधार पाऊस
  कास पठार : जागतिक वारसा स्थळ असलेले कास पठार कास बामनोली परिसरात गेल्या तीन-चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने
आदर्श माध्यमिक विद्यालय पेटेश्वर नगर मध्ये नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची उत्साहात स्वागत
आंधळीतील घरफोडीप्रकरणी चोरटा जेरबंद
सुभीत आयआयटी अँड मेडिकल अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचे जेईई आणि नीट परीक्षेत सुयश
कराड दक्षिणमधील ११ गावे सौर हायमास्ट दिव्यांनी उजळणार
महाराष्ट्र हायस्कूलमध्ये नवांगतांचे स्वागत व पाठ्यपुस्तकांचे वितरण
कृष्णा कारखान्याच्या मोफत घरपोच साखर वितरणास प्रारंभ

Advt