- राज्य
- मराठा आंदोलनाविरोधात व्यापारी संघटनेची तक्रार
मराठा आंदोलनाविरोधात व्यापारी संघटनेची तक्रार
राज्य सरकार अथवा मुंबई उच्च न्यायालयाने दखल घेण्याचे आवाहन
मुंबई: प्रतिनिधी
दक्षिण मुंबईत तीन दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनामुळे व्यापारी आणि व्यावसायिक यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत असून याप्रकरणी राज्य सरकार अथवा मुंबई उच्च न्यायालयाने दखल घ्यावी, अशी मागणी मुंबईतील व्यापारी संघटनेने केली आहे.
आझाद मैदानावर सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनामुळे दक्षिण मुंबईत मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असून या परिसरातील सर्वच कारभार ठप्प झाल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे शहरातील व्यापारी व व्यावसायिक यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. विशेषतः शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या काळातच हे आंदोलन सुरू असल्यामुळे नुकसानात भर पडत आहे, असे फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष विरेन शाह यांनी नमूद केले आहे.
राज्य सरकार अथवा मुंबई उच्च न्यायालयाने याप्रकरणी लक्ष घालून आंदोलकांच्या मागण्यांबाबत तोडगा काढावा आणि मुंबईत पूर्वस्थिती निर्माण करून व्यापाऱ्यांचे आणखी नुकसान टाळावे, अशी मागणी देखील शहा यांनी केली आहे.