गणेशविसर्जन मिरवणुकीत डॉल्बी आणि लेझर लाईट वापरण्यास बंदी

गणेशविसर्जन मिरवणुकीत डॉल्बी आणि लेझर लाईट वापरण्यास बंदी

सोलापूर: प्रतिनिधी

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी गणेश विसर्जन मिरवणुकांदरम्यान डॉल्बी सिस्टीम व लेझर लाईट वापरावर बंदी घातली आहे. नागरिकांच्या आरोग्यावर याचा गंभीर दुष्परिणाम होत असल्याची नोंद झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ (१) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून जिल्हाधिकाऱ्यांनी हा आदेश जारी केला आहे. २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर २०२५ या कालावधीत सार्वजनिक गणेश मंडळांना विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी सिस्टीम व लेझर लाईट वापरण्यास मनाई करण्यात आली आहे.

डॉल्बी सिस्टीममुळे काही भाविकांना कानदुखी व छातीच्या तक्रारी निर्माण झाल्या आहेत. तसेच लेझर लाईटच्या तीव्र प्रकाशामुळे लहान मुलांच्या व वयोवृद्धांच्या डोळ्यांवर परिणाम होऊन बुबळ व पडद्याला इजा झाल्याचेही निदर्शनास आले आहे.

हे पण वाचा  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले लालबागच्या राजाचे दर्शन

सोलापूर जिल्ह्यात गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा होतो. मोठ्या संख्येने सार्वजनिक मंडळांकडून विसर्जन मिरवणुका काढल्या जातात. मात्र, ध्वनी व प्रकाश प्रदूषणामुळे होणाऱ्या आरोग्यविषयक समस्यांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने ही बंदी लागू केली आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. 

About The Author

Advertisement

Latest News

मराठा आंदोलनाविरोधात व्यापारी संघटनेची तक्रार मराठा आंदोलनाविरोधात व्यापारी संघटनेची तक्रार
मुंबई: प्रतिनिधी दक्षिण मुंबईत तीन दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनामुळे व्यापारी आणि व्यावसायिक यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत असून याप्रकरणी...
'यापुढे पाणीही न पिता करणार तीव्र उपोषण'
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची 'मंडल यात्रा' स्थगित
'मतांच्या राजकारणासाठी मविआकडून राज्याची कोंडी'
लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठे यांचे निधन
'आंदोलनस्थळी झालेला युवकाचा मृत्यू प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे'
गणेशविसर्जन मिरवणुकीत डॉल्बी आणि लेझर लाईट वापरण्यास बंदी

Advt