चाकण औद्योगिक परिसरात मिनी कार्गो एअरपोर्ट उभारण्यासाठी हवाई वाहतूक मंत्री यांना निवेदन!

चाकण औद्योगिक परिसरात मिनी कार्गो एअरपोर्ट उभारण्यासाठी हवाई वाहतूक मंत्री यांना निवेदन!

मंचर प्रतिनिधी, संतोष वळसे पाटील

पुणे जिल्ह्यातील औद्योगिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या चाकण-तळेगाव एम.आय.डी.सी परिसरात मिनी कार्गो एअरपोर्ट उभारण्यात यावे, यासाठी फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन राज्याचे अध्यक्ष आणि अवसरी खुर्द ता.आंबेगाव येथील उद्योजक अभय भोर व उद्योजकांनी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची पुणे येथे भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.

निवेदनामध्ये अभय भोर यांनी नमूद केले की, पुणे जिल्ह्यातील भोसरी,पिंपरी चिंचवड,चाकण, तळेगाव,भीमा कोरेगाव,राजगुरुनगर,आळंदी,रांजणगाव परिसरात हजारो लघु व मध्यम उद्योजक कार्यरत असून, त्यांना माल वाहतुकीसाठी सध्या मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. वेळेवर माल पोहोचवणे, निर्यातीस चालना देणे व लॉजिस्टिक खर्च कमी करणे या दृष्टीने चाकण परिसरात कार्गो एअरपोर्ट ही काळाची गरज ठरत आहे.चाकण,पिंपरी चिंचवड, तळेगाव, रांजणगाव या भागात कमीत कमी 30 हजार ते 35 हजार छोटे-मोठे उद्योग आहेत.चाकण आणि परिसरातील कोणत्याही भागात मिनी कार्गो एअरपोर्ट झाल्यास नक्कीच उद्योजकांना सुविधाजनक सोय निर्माण होणार आहे. तरी कृपया आमच्या मागणीचा विचार करून चाकण येथे मिनी कार्गो एअरपोर्ट प्रस्ताव करावा.अशी मागणी उद्योजक संघटनेचे अध्यक्ष अभय भोर आणि उद्योजकांनी निवेदनाद्वारे हवाई वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे केली.यावेळी अध्यक्ष अभय भोर,उपाध्यक्ष वैभव जगताप,दुर्गा भोर,जयश्री साळुंखे,हर्षवर्धन लोखंडे,राजीव केंद्रे आदी उपस्थित होते.फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनतर्फे करण्यात आलेल्या या प्रयत्नामुळे परिसरातील उद्योजकांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले असून,या विमानतळामुळे औद्योगिक विकासाला आणखी गती मिळेल,असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

000

About The Author

Related Posts

Advertisement

Latest News

Advt