गौरायांचे उत्साहात आगमन...!

धन, धान्य, ऐश्वर्य, आरोग्य यासाठी महिलांनी केली प्रार्थना

गौरायांचे उत्साहात आगमन...!

पुणे : प्रतिनिधी

  घरोघरी  आज दुपारी महिलांनी गौरीचे थाटात, परंपरा राखत आवाहन,आगमन  साजरे केले. गौरी आवाहनाच्या पहिल्या दिवशी अंगणातील तुळशीपासून घरात गौरायांचे आगमन होते.गौरींची पूजा केली जाते.गौरींची पूजा-आरती करून केलेल्या फुलोरा आणि फराळाचा नैवेद्य दाखवला जातो.  सर्वांना धन, धान्य, ऐश्वर्य, आरोग्य   मिळो अशी प्रार्थना आगमनानंतर महिलांनी गौरीकडे केली.

अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी,धन,धान्य,ऐश्वर्य,आरोग्याची प्रार्थना करण्यासाठी  स्त्रिया भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षात गौरींचे पूजन करतात.गौरी किंवा महालक्ष्मीचे पूजन ज्येष्ठ नक्षत्रावर केले जाते, म्हणून यांना ज्येष्ठागौरी असेही संबोधले जाते.

पहिला दिवस गौरी आवाहनाचा असतो. माहेरवाशिणींना हा मान दिला जातो. आपापल्या पद्धत आणि परंपरेप्रमाणे घरातील प्रवेशद्वारापासून ते गौरी स्थापन करण्याच्या जागेपर्यंत रांगोळीने लक्ष्मीच्या पावलांचे ठसे काढले जातात. हातात गौरी घेऊन आलेल्या बाईचे पाय दुधाने व पाण्याने धुवून आणि त्यावर कुंकवाचे स्वस्तिक काढले जातात. आता येताना लक्ष्मीच्या पायांचे ठसे उमटवत उमटवत गौरींचे मुखवटे आणले . गौरी आगमन करत असताना ताट चमच्याने किंवा घंटेने वाजत गाजत गौरीचे स्वागत केले जाते. गौरीची स्थापना करण्यापूर्वी त्यांना घरातील समृद्धी, दूध-दुभत्याची जागा अशा गोष्टी दाखवल्या जातात. आशीर्वाद मिळून ऐश्वर्य नांदो, अशी प्रार्थना केली जाते. अशा या प्रथेला गौरी आवाहन करणे, असे संबोधतात.

गौरी पूजन शुक्रवार २२ सप्टेंबर २०२३ रोजी आहे. हा दुसरा दिवस 
 गौरी पूजनाचा असतो. दुपारी १२ वाजेपर्यंत गौरीला नैवेद्य दाखवला जाणार आहे. 

About The Author

Advertisement

Latest News

Advt