एक हजार मांजरांना एकाच वेळी पाहण्याची संधी

एक हजार मांजरांना एकाच वेळी पाहण्याची संधी
मुंबई / रमेश औताडे 
 
प्राणी प्रेमींसाठी नवी मुंबई वाशी येथील सिडको प्रदर्शन सेंटर येथे २५ मे रोजी  रविवारी एक 'कॅट शो' रंगणार असून  विविध प्रजातीच्या हजारपेक्षा जास्त मांजर मांजरी पाहण्याची संधी मांजर प्रेमीना मिळणार असल्याची माहिती आयोजक फिलाइन क्लब ऑफ इंडियाचे अध्यक्ष साकिब पठाण यांनी पत्रकार परिषदेत दिली. 
 
जागतिक दर्जाच्या कॅट शोमध्ये पर्शियन, क्लासिक लाँग हेअर, एक्झॉटिक शॉर्ट हेअर, मेन कुन अशा विविध देशी-परदेशी जातीच्या मांजरी सहभागी होणार आहेत, जागतिक स्तरावरील तज्ज्ञ यावेळी परीक्षक म्हणून उपस्थित राहणार आहे. क्लबने भारतीय भटक्या मांजरांना 'इंडियामाऊ' अशी ओळख मिळवून देण्यात यश मिळवले आहे. यावेळी मांजरांना दत्तक घेता येणार असल्याचेही आयोजकांनी सांगितले.
 
मुंबई प्रेस क्लब येथे पत्रकार परिषदेत आणलेली मांजरे.
 
000
Tags:

About The Author

Related Posts

Advertisement

Latest News

मराठा एन्त्रेप्रेनेऊर असोसिएशनच्या वतीने ‘लोन आणि सबसिडी एक्स्पो-2025’ चे आयोजन मराठा एन्त्रेप्रेनेऊर असोसिएशनच्या वतीने ‘लोन आणि सबसिडी एक्स्पो-2025’ चे आयोजन
पुणे: प्रतिनिधी पुण्यातील उद्योजक आणि स्वतंत्र व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या उद्योजकांना विविध शासकीय योजना, बँकांच्या योजना, वित्तीय संस्था देत असलेल्या...
'अजित पवार यांनीच कृषी मंत्री पदाची जबाबदारी घ्यावी'
एमआयडीसी परिसरात दोन कंपन्यांना भीषण आग
'शालेय विद्यार्थी हत्या प्रकरणी अघोरी बाबाची चौकशी करा'
नितीन गडकरी यांना यावर्षीचा लोकमान्य टिळक पुरस्कार जाहीर
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त संत संमेलन
'महापालिका हद्दीत इमारतींना मराठी नाव द्या'

Advt